रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असेलली कंपनी इन्व्हेंटुरस नॉलेज सोल्यूशन्स (Inventurus Knowledge Solutions) चा IPO गुरुवार, 12 डिसेंबर 2024 रोजी गुंतवणूकदारांसाठी ओपन होत आहे. यासाठी कंपनीने 1,265-1,329 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केला आहे. या प्राईस बाँडमध्ये कंपनीला 2,497.92 कोटी रुपये उभे करायचे आहेत. हा IPO 12 डिसेंबर रोजी खुला होणार असून 16 डिसेंबर रोजी बंद होईल, असे कंपनीने सोमवारीच एका निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, अँकर गुंतवणूकदार 11 डिसेंबरलाच बोली लावू शकतील. तसेच, किरकोळ गुंतवणूकदारांना 11 शेअर्सच्या एका लॉटसाठी बोली लावण्याकरता किमान 14,619 रुपये गुंतवावे लागतील. महत्वाचे म्हणजे, 200000 रुपयांच्या आत कमाल बोलीसाठी, किरकोळ गुंतवणूकदारांना 13 लॉट अथवा 143 शेअर्ससाठी अर्ज करता येईल.
काय सुरू आहे GMP? -
Investorgain.com नुसार, इन्व्हेटुरस नॉलेज सोल्युशन्सच्या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम 360 रुपयांवर आहे. म्हणजेच कंपनीचा शेअर 1689 वर लिस्ट होऊ शकतात. अर्थात गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जवळपास 28% चा नफा होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या शेअर्सची संभाव्य लिस्टिंग तारीख 19 डिसेबर ही आहे.
75 टक्के भाग क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी राखीव -
आयपीओच्या किमान 75 टक्के भाग क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी जास्तीत जास्त 10 टक्के आणि नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी जास्तीत जास्त 15 टक्के राखीव ठेवण्यात येणार आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 65 हजार शेअर्स राखीव ठेवले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला 1857.94 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तर कर भरल्यानंतर कंपनीला कर भरल्यानंतर 370.49 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)