Lokmat Money >शेअर बाजार > बाजारात हाहाकार सुरू असतानाच हा स्वस्तातला शेअर बनलाय रॉकेट, किंमत 2 रुपयांहूनही कमी!

बाजारात हाहाकार सुरू असतानाच हा स्वस्तातला शेअर बनलाय रॉकेट, किंमत 2 रुपयांहूनही कमी!

२३ जानेवारी २०२४ रोजी हा शेअर २.३६ रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 14:50 IST2025-01-18T14:50:30+5:302025-01-18T14:50:56+5:30

२३ जानेवारी २०२४ रोजी हा शेअर २.३६ रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.

Share market penny stock sattva sukun lifecare gain near 10 percent in market selloff know about detail | बाजारात हाहाकार सुरू असतानाच हा स्वस्तातला शेअर बनलाय रॉकेट, किंमत 2 रुपयांहूनही कमी!

बाजारात हाहाकार सुरू असतानाच हा स्वस्तातला शेअर बनलाय रॉकेट, किंमत 2 रुपयांहूनही कमी!

शेअर बाजारात गेल्या शुक्रवारी विक्रीचे वातावरण होते. दरम्यान, सत्व सुकून लाईफकेअरचे शेअर्स खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड दिसून आली. हा शेअर ९.४२% ने वाढून १.५१ रुपयांवर बंद झाला. शेअरचा मागील बंद भाव १.३८ रुपये होता. २३ जानेवारी २०२४ रोजी हा शेअर २.३६ रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. जुलै २०२४ मध्ये या शेअरची किंमत ०.७५ पैसे एवढी होती. हा या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक आहे.

प्रमोटर्सनी वाढवली हिस्सेदारी -
सत्त्व सुकून लाईफकेअर लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नसंदर्भात बोलायचे झाल्यास, सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत प्रमोटरचा हिस्सा वाढला आहे. डिसेंबरमध्ये प्रमोटरकडे ३.६३ टक्के हिस्सा होता. ऑक्टोबरमध्ये प्रमोटरचा हिस्सा ३.११ टक्के होता. तसेच, सार्वजनिक भागभांडवल ९६.३७ टक्के आहे.

बाजारातील तेजीवर ब्रेक - 
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अर्थात शुक्रवारी शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक लागला. सेंसेक्स 423.49 अंक अर्थात 0.55 टक्क्यांनी घसरून 76,619.33 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निर्देशांक निफ्टी देखील १०८.६० अंकांनी किंवा ०.४७ टक्क्यांनी घसरून २३,२०३.२० वर बंद झाला.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share market penny stock sattva sukun lifecare gain near 10 percent in market selloff know about detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.