Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Opening: शेअर बाजारात तेजी, बँकिंग स्टॉक्समध्ये खरेदी; Nifty च्या 'या' स्टॉक्समध्ये तेजी

Share Market Opening: शेअर बाजारात तेजी, बँकिंग स्टॉक्समध्ये खरेदी; Nifty च्या 'या' स्टॉक्समध्ये तेजी

Share Market Opening: शेअर बाजारात ख्रिसमसच्या सुट्टीनंतर गुरुवारी व्यवहार सुरू झाले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४८ अंकांच्या वाढीसह २३,७७६ वर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 09:53 IST2024-12-26T09:53:06+5:302024-12-26T09:53:06+5:30

Share Market Opening: शेअर बाजारात ख्रिसमसच्या सुट्टीनंतर गुरुवारी व्यवहार सुरू झाले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४८ अंकांच्या वाढीसह २३,७७६ वर उघडला.

Share Market Opening Stock market bullish buying in banking stocks Nifty s those stocks bullish | Share Market Opening: शेअर बाजारात तेजी, बँकिंग स्टॉक्समध्ये खरेदी; Nifty च्या 'या' स्टॉक्समध्ये तेजी

Share Market Opening: शेअर बाजारात तेजी, बँकिंग स्टॉक्समध्ये खरेदी; Nifty च्या 'या' स्टॉक्समध्ये तेजी

Share Market Opening: शेअर बाजारात ख्रिसमसच्या सुट्टीनंतर गुरुवारी व्यवहार सुरू झाले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४८ अंकांच्या वाढीसह २३,७७६ वर तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८४ अंकांच्या वाढीसह ७८,५५७ वर उघडला. त्यानंतर सेन्सेक्समध्ये आणखी तेजी दिसून आली.

बँकिंग शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. निफ्टी ५० निर्देशांकात बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. तर निफ्टी ५० शेअर्समध्ये दिवसभरात सर्वाधिक घसरण एशियन पेंट्स, एचडीएफसी लाइफ, डॉक्टर रेड्डीज, सिप्ला, ट्रेंट, टीसीएस या शेअर्समध्ये दिसून आली.

शेअर बाजारात गेल्या आठवड्यात झालेल्या घसरणीनंतर या आठवड्यात सोमवारी तेजीसह व्यवहार सुरू झाले. निफ्टीसाठी वरच्या लेव्हलवर २३,८०० चा पहिला रेझिस्टन्स बनला आहे. परंतु मंगळवारी निफ्टीनं या लेव्हलच्या वर जाऊन ट्रेड केलं आणि नंतर त्यात सेलिंग प्रेशर दिसून आलं. सध्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी दिसून येत आणि तो सध्या आपल्या लाँग टर्म मुव्हिंग एव्हरेजच्या सपोर्ट झोनच्या जवळ आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Web Title: Share Market Opening Stock market bullish buying in banking stocks Nifty s those stocks bullish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.