Lokmat Money >शेअर बाजार > ट्रम्प टॅरिफचा बार फुसका? निफ्टी-सेन्सेक्समध्ये जोरदार उसळी; या सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ

ट्रम्प टॅरिफचा बार फुसका? निफ्टी-सेन्सेक्समध्ये जोरदार उसळी; या सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ

Share Market Today : मंगळवारच्या मोठ्या घसरणीनंतर बुधवारी भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ झाली आहे. सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हावर बंद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:37 IST2025-04-02T16:36:02+5:302025-04-02T16:37:16+5:30

Share Market Today : मंगळवारच्या मोठ्या घसरणीनंतर बुधवारी भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ झाली आहे. सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हावर बंद झाले.

share market news today nifty sensex closes on hgih nifty gainers losers | ट्रम्प टॅरिफचा बार फुसका? निफ्टी-सेन्सेक्समध्ये जोरदार उसळी; या सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ

ट्रम्प टॅरिफचा बार फुसका? निफ्टी-सेन्सेक्समध्ये जोरदार उसळी; या सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ

Share Market Today : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेपूर्वी बुधवारी भारतीय बाजार तेजीत बंद झाला. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारतीय शेअर बाजारांचे मोठे नुकसान करणाऱ्या अस्थिरतेची स्थिती नवीन आर्थिक वर्षातही कायम आहे. मंगळवारच्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार आज लक्षणीय वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या वाढीसह बंद झाले. निफ्टीने इंट्राडे २३,३५० ची पातळी ओलांडण्यात यश मिळविले. बीएसईच्या सर्व क्षेत्र निर्देशांकांमध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी बँक १% पेक्षा जास्त वाढून बंद झाला. मिडकॅप निर्देशांकातही १.५% पेक्षा जास्त वाढ दिसून आली.

कोणत्या सेक्टरमध्ये काय घडलं?
आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हावर बंद झाले. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात वाढ झाली. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज ०.७२ टक्के वाढीसह २३,३३२ वर बंद झाला. NSE वर व्यापार झालेल्या २,९७७ समभागांपैकी २१४८ समभाग हिरव्या रंगात, ७५७ समभाग लाल आणि ७२ समभाग कोणत्याही बदलाशिवाय बंद झाले. एनएसईचे ३९ समभाग ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत. ४२ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. आज २४७ शेअर्समध्ये अप्पर सर्किट आणि २६ शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे.

या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
एनएसई समभागांमध्ये आज सर्वात मोठी वाढ हेस्टर बायोसायन्समध्ये २० टक्के होती. याशिवाय बाजार स्टाइलमध्ये २० टक्के, ऑर्चस्पमध्ये १९.९२ टक्के, कीनोट फायनान्शिअलमध्ये १९.१५ टक्के, गुजरात अल्कलीजने १७.५५ टक्के वाढ नोंदवली. याशिवाय पंजाब अँड सिंध बँक १२ टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडिया १०.९७ टक्के आणि पेरिया करमलाई ८.५९ टक्क्यांनी सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली.

वाचा - वाईट पद्धतीनं क्रॅश झाले 'हे' सरकारी बँकांचे शेअर्स; फंड उभारुनही गुंतवणूकदारांची पाठ, तुमच्याकडे आहेत का?

प्रॉपर्टी क्षेत्रात सर्वाधिक उसळी
क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे तर बुधवारी निफ्टी रिॲल्टीमध्ये सर्वाधिक ३.६१ टक्के वाढ नोंदवली गेली. याशिवाय निफ्टी एफएमसीजी १.१३ टक्क्यांनी, निफ्टी ऑटो ०.८२ टक्के, निफ्टी आयटी ०.८४ टक्के, निफ्टी मीडियामध्ये ०.६१ टक्के, निफ्टी मेटलमध्ये ०.७० टक्के, निफ्टी फार्मामध्ये ०.८७ टक्के, निफ्टी पीएसयू बँकेत ०.७४ टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँकेत ०.७४ टक्के, निफ्टी हेल्थकेअर इंडेक्समध्ये ०.७९ टक्के, निफ्टी कन्झ्युमर इंडेक्समध्ये २.५१ टक्के आणि निफ्टी कंज्यूमर ड्यूरेबल्समध्ये २.५१ टक्के, निफ्टी मिडस्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेसने १.३१ टक्क्यांनी वाढ दर्शविली.

Web Title: share market news today nifty sensex closes on hgih nifty gainers losers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.