Lokmat Money >शेअर बाजार > परकीय गुंतवणूकदारांसमोर बाजाराची शरणागती? मार्केट घसरणीसह बंद; या सेक्टरला मोठा फटका

परकीय गुंतवणूकदारांसमोर बाजाराची शरणागती? मार्केट घसरणीसह बंद; या सेक्टरला मोठा फटका

Stock Market : निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये सप्टेंबरच्या शिखरापेक्षा १२-१३% ची घसरण झाली आहे. ही घसरण अशीच सुरू राहिली तर देशांतर्गत गुंतवणुकीचा ओघ कमी होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:12 IST2025-02-20T16:12:52+5:302025-02-20T16:12:52+5:30

Stock Market : निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये सप्टेंबरच्या शिखरापेक्षा १२-१३% ची घसरण झाली आहे. ही घसरण अशीच सुरू राहिली तर देशांतर्गत गुंतवणुकीचा ओघ कमी होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.

share market news nifty sensex crash upto 13 percent from high | परकीय गुंतवणूकदारांसमोर बाजाराची शरणागती? मार्केट घसरणीसह बंद; या सेक्टरला मोठा फटका

परकीय गुंतवणूकदारांसमोर बाजाराची शरणागती? मार्केट घसरणीसह बंद; या सेक्टरला मोठा फटका

Stock Market : गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात सुरू झालेली बाजारातील घसरण थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. ४ महिन्यात निफ्टी १३% आणि सेन्सेक्स १२% नी घसरला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये तर मोठी घसरण झाली आहे. या घसरणीत मिडकॅप शेअर्स १६% आणि स्मॉलकॅप शेअर्स २०% ने घसरले आहेत. निफ्टी ५०० इंडेक्स देखील १५% ने घसरला आहे. बाजाराची ही कमजोरी गुंतवणूकदारांसाठी मोठा धक्का ठरत आहे. गुरुवारी (२० फेब्रुवारी) शेअर बाजारात कमजोर व्यवहार दिसून आला. दिवसभर लाल रंगात व्यवहार केल्यानंतर निफ्टी १९ अंकांनी तर सेन्सेक्स २०३ अंकांनी घसरला.

परकीय गुंतवणूकदारांची गळती थांबेना
बाजार घसरण्यामागे सर्वात मोठं कारण परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री आहे. २६ सप्टेंबर २०२४ पासून, FII ने आतापर्यंत ३ लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. तर २०२५ च्या सुरुवातीपासून, FII ने सुमारे १.०६ लाख कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत.

कोणत्या शेअर्समध्ये तेजी?
निफ्टीच्या साप्ताहिक मुदतीनंतर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला होता. निफ्टीही ७० अंकांनी घसरला होता. बँक निफ्टीमध्ये १५० अंकांची कमजोरी होती. ओपनिंगसह, निफ्टीवर आयटीसी, मारुती, एअरटेल सारख्या मोठ्या समभागांमध्ये घसरण दिसून आली. एचडीएफसी बँकेतील कमजोरीमुळे बँक निफ्टीवर दबाव होता. ऑटो आणि एफएमसीजी निर्देशांकात सर्वात मोठी घसरण झाली. तर मेटल इंडेक्समध्ये वाढ झाली. त्याच वेळी, श्रीराम फायनान्स, हिंदाल्को, सिप्ला, इन्फोसिस यांनी निफ्टीमध्ये वाढ नोंदवली.

भारतीय गुंतवणूकदारांची मनस्थिती कशी?
या घसरणीदरम्यान, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) बाजारात सुमारे ३.४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. २०२५ च्या सुरुवातीपासून, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) १.२ लाख कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. ब्रोकरेज फर्म जेफरीजने आपल्या नवीन अहवालात म्हटले आहे की म्युच्युअल फंडातील लहान गुंतवणूकदारांच्या पैशाच्या गुंतवणुकीचा वेग कमी होऊ शकतो. भारतीय गुंतवणूकदारांनी बाजारातून माघार घेतल्यास शेअरच्या किमती आणखी खाली येऊ शकतात.
 

Web Title: share market news nifty sensex crash upto 13 percent from high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.