Lokmat Money >शेअर बाजार > बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच

बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच

  अमेरिकेसोबत सुरू असलेल्या टॅरिफ वादामुळे बाजाराने गतसप्ताहात सावध भूमिका घेतली. त्यामुळे दोन सप्ताहांपासून वाढत असलेला बाजार खाली आला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 05:34 IST2025-07-14T05:34:19+5:302025-07-14T05:34:26+5:30

  अमेरिकेसोबत सुरू असलेल्या टॅरिफ वादामुळे बाजाराने गतसप्ताहात सावध भूमिका घेतली. त्यामुळे दोन सप्ताहांपासून वाढत असलेला बाजार खाली आला. 

Share Market movements will determine the results of companies; | बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच

बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच

प्रसाद गो. जोशी
टॅरीफबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील दोन सप्ताहांची वाढ थांबली. येत्या सप्ताहात विविध कंपन्यांचे जाहीर होणारे तिमाही निकाल बाजाराला दिशा देऊ शकतात भारत - अमेरिका व्यापार कराराच्या असे बोलणे चर्चेबाबत बाजार सकारात्मक असून त्यावरही लक्ष राहणार आहे, सप्ताहात जाहीर होणारी विविध आकडेवारी बाजाराला कोणती दिशा देणार, याकडेही लक्ष लागलेले असेल. 

  अमेरिकेसोबत सुरू असलेल्या टॅरिफ वादामुळे बाजाराने गतसप्ताहात सावध भूमिका घेतली. त्यामुळे दोन सप्ताहांपासून वाढत असलेला बाजार खाली आला. 

या आठवड्यात काय?
या सप्ताहातही भारत- अमेरिकेदरम्यानच्या व्यापारी चर्चेवर बाजार अवलंबून आहे. तरीही सप्ताहात जाहीर होणारी विविध प्रकारची आकडेवारी आणि कंपन्यांचे तिमाही निकाल हेच बाजाराचे प्रमुख दिशादर्शक असतील. येत्या १४ तारखेला महागाई निर्देशांक आधारित चलनवाढीची आकडेवारी जाहीर होईल. 
अमेरिकेतील चलनवाढ, औद्योगिक उत्पादन आणि बेरोजगारीची आकडेवारीही येणार आहे. या सप्ताहात भारतामधील अनेक प्रमुख कंपन्या  तिमाही निकालाची आकडेवारी जाहीर करतील. या आकडेवारीनुसार बहुदा कंपन्यांच्या बाजारभावामध्ये वाढ अथवा घट होऊ शकते. बाजाराचा हा प्रमुख ड्रायव्हिंग फोर्स असणार आहे. 

विक्रीचा मारा सुरूच
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये खरेदी करणाऱ्या परकीय वित्त संस्था भारतामध्ये विक्री करीत असल्याचे दिसून आले आहे गतसप्ताहात या संस्थांनी ५१०४ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. त्याचवेळी देशांतर्गत वित्तसंस्थांनी खरेदी चालू ठेवली. गतसप्ताहात या संस्थांनी ३५५८ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहे.

Web Title: Share Market movements will determine the results of companies;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.