Lokmat Money >शेअर बाजार > सरकारचा एक निर्णय अन् शेअर बनला रॉकेट, 20 दिवसांत दिला खटा-खट परतावा! आणखी वधारणार?

सरकारचा एक निर्णय अन् शेअर बनला रॉकेट, 20 दिवसांत दिला खटा-खट परतावा! आणखी वधारणार?

हा शेअर एका महिन्याच्या आत 140% पर्यंत वधारला आहे. 27 मे 2024 च्या क्लोज प्राइसनंतर या आयटी शेअरची किंमत 136 रुपयांनी वधारून 326.80 रुपयांवर पोहोचली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 04:34 PM2024-06-25T16:34:15+5:302024-06-25T16:36:02+5:30

हा शेअर एका महिन्याच्या आत 140% पर्यंत वधारला आहे. 27 मे 2024 च्या क्लोज प्राइसनंतर या आयटी शेअरची किंमत 136 रुपयांनी वधारून 326.80 रुपयांवर पोहोचली आहे.

Share Market moschip technologies ltd Stock surges 140 percent just in 20 days expert says buy | सरकारचा एक निर्णय अन् शेअर बनला रॉकेट, 20 दिवसांत दिला खटा-खट परतावा! आणखी वधारणार?

सरकारचा एक निर्णय अन् शेअर बनला रॉकेट, 20 दिवसांत दिला खटा-खट परतावा! आणखी वधारणार?

मॉसचिप टेक्नोलॉजीजच्या शेअरमध्ये गेल्या एका महिन्यात जबरदस्त तेजी दिसून आली आहे. हा शेअर एका महिन्याच्या आत 140% पर्यंत वधारला आहे. 27 मे 2024 च्या क्लोज प्राइसनंतर या आयटी शेअरची किंमत 136 रुपयांनी वधारून 326.80 रुपयांवर पोहोचली आहे. आज मंगळवारीही हा शेअर जवळपास 5% ने वधारला आहे.

असं आहे तेजीचं कारण - 
मॉसचिप टेक्नॉलॉजीजच्या शेअरमधील तेजीचे एक कारण म्हणजे, कंपनीला भारत सरकारकडून सेमीकंडक्टर डिझाइन लिंक्ड इंसेंटिव्ह (डीएलआय) योजनेंतर्गत मंजूर झालेली सब्सिडी. याशिवाय कंपनीला इतरही काही मोठे वर्क ऑर्डर मिळाले आहेत. याशेअरसंदर्भात प्रॉफिटमार्ट सिक्योरिटीजचे रिसर्च प्रमुख अविनाश गोरक्षकर यांनी म्हटले आहे की, "भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या आयटी स्टॉकमध्ये वाढ होताना दिसत आहे. DLI योजनेंतर्गत ही सबसिडी या छोट्या भारतीय आयटी कंपनीसाठी मोठे प्रोत्साहन आहे. यामुळे जागतिक सेमीकंडक्टर मार्केटमध्ये स्पर्धा करण्यासाठी कंपनीला बळ मिळेल. शिवाय, कंपनीला अलीकडे काही मोठ्या वर्क ऑर्डरही मिळाल्या आहेत, यामुळेही या शेअरमध्ये आणखी वाढ झाली आहे."

काय म्हणताय ब्रोकरेज -
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया या शेअरच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यामते, "स्टॉक चार्ट पॅटर्न सातत्याने पॉझिटिव्ह संकेत देत आहे. हा शेअर ₹330 ते ₹350 पर्यंत पोहोचू शकतो. मात्र, आगामी सत्रात तो ₹270 च्या वर कायम असावा. आमच्या विद्यमान शेयरधारकांसाठी, आम्ही या संभाव्य लाभासाठी ₹470 प्रति शेअरवर स्टॉप लॉस सेट करत स्टॉक ठेवण्याचा सल्ला देतो." 

तसेच, "उच्च जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या लोकांसाठी, क्रमशः ₹330 आणि ₹350 च्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने स्टॉक खरेदी करणे आणि ठेवणे फायदेशीर ठरू शकते. महत्वाचे म्हणजे, हे कुठलीही नव्या स्थितीला सुरुवात करताना स्टॉप लॉस ₹२७० वर राखणे महत्त्वाचे आहे," असेही सुमीत बगाडिया यांनी म्हटले आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share Market moschip technologies ltd Stock surges 140 percent just in 20 days expert says buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.