Lokmat Money >शेअर बाजार > एलआयसीनं या कंपनीचे 1 कोटीहून अधिक शेअर विकले, घसरून ₹109 वर आलाय भाव; जाणून घ्या सविस्तर

एलआयसीनं या कंपनीचे 1 कोटीहून अधिक शेअर विकले, घसरून ₹109 वर आलाय भाव; जाणून घ्या सविस्तर

यापूर्वी, एलआयसीकडे ३,५६,०२,५३९ शेअर्स होते, अर्थात ७.२६ टक्के हिस्सेदारी. यांपैकी १,००,८२,३२६ शेअर्स (२.०६ टक्के हिस्सा) विकल्यानंतर, एलआयसीचा हिस्सा आता २,५५,२०,२१३ शेअर्स किंवा ५.२० टक्के एवढा राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 20:42 IST2025-01-20T20:40:07+5:302025-01-20T20:42:07+5:30

यापूर्वी, एलआयसीकडे ३,५६,०२,५३९ शेअर्स होते, अर्थात ७.२६ टक्के हिस्सेदारी. यांपैकी १,००,८२,३२६ शेअर्स (२.०६ टक्के हिस्सा) विकल्यानंतर, एलआयसीचा हिस्सा आता २,५५,२०,२१३ शेअर्स किंवा ५.२० टक्के एवढा राहिला आहे.

Share market lic trims stake in national fertilizers stocks sells over 1 crore share 2 percent stake | एलआयसीनं या कंपनीचे 1 कोटीहून अधिक शेअर विकले, घसरून ₹109 वर आलाय भाव; जाणून घ्या सविस्तर

एलआयसीनं या कंपनीचे 1 कोटीहून अधिक शेअर विकले, घसरून ₹109 वर आलाय भाव; जाणून घ्या सविस्तर

खते तयार करणारी कंपनी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडचा (एनएफएल) शेअर सोमवारच्या व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होता. हा शेअर आज इंट्राडे २.५% ने घसरून १०९.६५ रुपयांच्या दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. शेअर्समध्ये ही घसरण एक बातमीमुळे झाली आहे. खरे तर, भारतीय जीवन विमा महामंडळने (LIC) नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमधील आपला हिस्सा कमी केला आहे.

जाणून घ्या सविस्तर - 
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडच्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, एलआयसीने कंपनीतील आपला हिस्सा कमी केला आहे. यापूर्वी, एलआयसीकडे ३,५६,०२,५३९ शेअर्स होते, अर्थात ७.२६ टक्के हिस्सेदारी. यांपैकी १,००,८२,३२६ शेअर्स (२.०६ टक्के हिस्सा) विकल्यानंतर, एलआयसीचा हिस्सा आता २,५५,२०,२१३ शेअर्स किंवा ५.२० टक्के एवढा राहिला आहे. एक्सचेंज फाइलिंगनुसार, विमा कंपनीने ६ ऑक्टोबर २०२३ ते १७ जानेवारी २०२५ दरम्यान नॅशनल फर्टिलायझर्सचे शेअर्स टप्प्या टप्प्याने खरेदी-विक्री केले.

अशी आहे शेअरची स्थिती -
एनएफएलचा शेअर 20 जानेवारीला बीएसईवर इंट्राडे ट्रेडमध्ये एक टक्क्याने घसरला. स्टॉक ₹110.55 च्या बंदच्या तुलनेत ₹111.35 वर खुला झाला आणि 0.81 टक्क्यांच्या घसरणीसह ₹109.65 च्या इंट्राडे निचांकावर आला. खरे तर, इंड्रा डे हाय 112.50 रुपयांच्या तुलनेत तो 2.5% घसरून 109.65 रुपयांवर आला होता. कंपनीचा शेअर 14 मार्चला 52-आठवड्यांच्या निचांकी पातळीवर म्हणजेच ₹83 वर पोहोचला होता. यानंतर, गेल्या वर्षी 23 जुलैला 52-आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच ₹169.95 वर पोहोचला होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share market lic trims stake in national fertilizers stocks sells over 1 crore share 2 percent stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.