भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) सार्वजनिक क्षेत्रातील रेल्वे स्टॉक कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CONCOR) मध्ये आपला हिस्सा वाढवला आहे. कंपनीने बुधवारी (२२ जानेवारी) शेअर बाजाराला यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, आज कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये अल्पशी वृद्धी होऊन तो ७५८.२५ रुपयांचा इंट्राडे उच्चांकावर पोहोचला आहे.
एलआयसीने म्हटले आहे की, ६ सप्टेंबर २०२४ ते २१ जानेवारी २०२५ दरम्यान CONCOR मधील त्यांचा हिस्सा २.०२८% ने वाढला आहे. सप्टेंबरमध्ये, एलआयसीकडे CONCOR चे ४.७४ कोटी शेअर्स अर्थात ७.७८% हिस्सा होता. काल, २१ जानेवारीपर्यंत, त्यांचे शेअरहोल्डिंग ५.९७ कोटी शेअर्स अथवा ९.८०९% एवढी झाली.
दरम्यान, याच महिन्यात एलआयसीने कॉनकोरचे सुमारे ४० लाख शेअर्स विकत घेतले आहेत. डिसेंबर २०२४ च्या तिमाहीअखेर त्यांची हिस्सेदारी ५.५७ कोटी होती, जी २१ जानेवारीपर्यंत वाढून ५.९७ कोटी शेअर्सपर्यंत पोहोचली. कंपनीने खुल्या बाजारातील खरेदीद्वारे CONCOR मधील हिस्सा विकत घेतला होता.
कॉनकॉर शेअरचा परफॉर्मेंस -
गेल्या एका वर्षात पीएसयू रेल्वे स्टॉक कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या शेअर्सची कामगिरी खराब राहिली. या कालावधीत स्टॉक १५% ने घसरला. एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांचा विचार करताही, स्टॉकची कामगिरी निराशाजनकच राहिली, या कालावधीत हा शेअर अनुक्रमे ३%, १२% आणि २६% ने घसरला. या वर्षी आतापर्यंत स्टॉक ४% ने घसला आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत १,१९३.९५ रुपये तर नीचांकी किंमत ७२५.२५ रुपये आहे. त्याचे मार्केट कॅप ४६,०७७ रुपये आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)