Share Market : मागील आठवड्यात शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले. तरीदेखील बीएससी सेन्सेक्स 524 अंकांनी किंवा 0.66 टक्क्यांनी वाढला. यामुळे सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. एकीकडे मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्समच्या गुंतवणूकदारांनी अवघ्या पाच दिवसांत 41,000 कोटींहून अधिक रक्कम छापली, तर टाटा समूहाच्या TCS, HDFC बँक आणि SBI यांना मोठा तोटा सहन करावा लागला.
रिलायन्ससह 6 कंपन्यांची मोठी कमाई
गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी चार मोठ्या कंपन्यांचे बाजारमूल्य घटले. या कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, HDFC बँक, ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे. या चार कंपन्यांना एकत्रितपणे 96,605.66 कोटी रुपयांचा फटका बसला. तर, भारती एअरटेल, इन्फोसिस, आयटीसी, एलआयसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हरसह रिलायन्सचे बाजार मूल्य संयुक्तपणे 82,861.16 कोटी रुपयांनी वाढले. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा झाला, तर एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान झाले.
मुकेश अंबानींच्या कंपनीची कामगिरी
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज या देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे बाजार भांडवल पाच व्यापार दिवसात 16,93,373.48 कोटी रुपये झाले. यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 15,331.08 कोटी रुपयांनी वाढून 5,65,194.18 कोटी रुपये झाले, तर एलआयसीचे बाजार भांडवल 13,282.49 कोटी रुपयांनी वाढून 5,74,689.29 कोटी रुपये झाले.
HDFC-SBI ला तोटा
गेल्या आठवड्यात HDFC बँकेचे बाजार भांडवल 37,025.46 कोटी रुपयांनी घसरून 13,37,919.84 कोटी रुपये झाले. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल 29,324.55 कोटी रुपयांनी घसरुन 8,93,378.50 कोटी रुपयांवर आले, तर टीसीएसचे बाजार भांडवल 24,856.26 कोटी रुपयांनी घसरून 14,83,144.53 कोटी रुपयांवर आणि एसबीआयचे 5,399.39 कोटी रुपयांनी घसरून 7,680 कोटी रुपयांवर आले.
(टीप-शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)