Share Market : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी आठ दिग्गज कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये प्रचंड वाढ झाली. या आठवड्यातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपनीमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) अव्वल ठरली. कंपनीच्या गुंतवणूकदारांनी अवघ्या पाच दिवसांत तब्बल ₹45,000 कोटींचा नफा कमावला.
सेन्सेक्समध्ये 1.59% वाढ, गुंतवणूकदार मालामाल
संपूर्ण आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 1,293.65 अंकांनी (1.59%) वाढला. ज्या कंपन्यांच्या मार्केट व्हॅल्यूत वाढ झाली, त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, बजाज फायनान्स आणि इन्फोसिस यांचा समावेश आहे. या आठही कंपन्यांच्या एकत्रित मार्केट कॅपमध्ये तब्बल ₹1,94,148.73 कोटींची वाढ झाली. दुसरीकडे, एलआयसी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) यांच्या गुंतवणूकदारांना तोटा झाला.
टीसीएस गुंतवणूकदारांची चांदी
टाटा ग्रुपमध्ये काहीसा अस्थिरतेचा काळ असला तरी, TCS च्या तिमाही निकालांनी बाजाराला जबरदस्त बुस्ट दिला. TCS च्या शेअरमध्ये आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती पाचच दिवसांत ₹45,678 कोटींनी वाढली. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप ₹10,95,701.62 कोटींवर पोहोचले. इन्फोसिसलाही फायदा झाला. कंपनीचे मार्केट कॅप ₹28,125.29 कोटींनी वाढून ₹6,29,080.22 कोटींवर पोहोचले.
रिलायन्स, HDFC बँक, एअरटेलही वधारले
HDFC Bank च्या गुंतवणूकदारांना ₹25,135.62 कोटींचा नफा झाला. कंपनीचे मार्केट कॅप आता ₹15,07,025.19 कोटींवर पोहोचले आहे. भारती एअरटेलच्या शेअर्सनीही दमदार कामगिरी केली, कंपनीचे मार्केट कॅप ₹25,089.27 कोटींनी वाढून ₹11,05,980.35 कोटींवर गेले आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मार्केट कॅपमध्येही ₹25,035.08 कोटींची वाढ झाली, ज्यामुळे तिची किंमत ₹18,70,120.06 कोटींवर पोहोचले.
याशिवाय, बजाज फायनान्सचे मार्केट कॅप ₹21,187.56 कोटींनी वाढून ₹6,36,995.74 कोटींवर गेले, तर एसबीआयचे मूल्य ₹12,645.94 कोटींच्या वाढीसह ₹8,12,986.64 कोटींवर पोहोचले. ICICI Bank ही ₹11,251.62 कोटींचा फायदा झाला आणि ती ₹9,86,367.47 कोटींवर गेली.
एलआयसी आणि HUL ला धक्का
या तेजीच्या वातावरणातही दोन कंपन्यांनी गुंतवणूकदारांना तोटा दिला. एलआयसीच्या मार्केट कॅपमध्ये ₹4,648.88 कोटींची घसरण होऊन ते ₹5,67,858.29 कोटींवर आले. तर, HUL (हिंदुस्तान युनिलिव्हर)चे मूल्यही ₹3,571.37 कोटींनी घटून ₹5,94,235.13 कोटींवर पोहोचले.
(टीप:शेअर बाजारातील गुंतवणुकीपूर्वी नेहमी आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)