Share Market: अमेरिकन फेडरल रिझर्व्हने अपेक्षेप्रमाणे या वर्षी पहिल्यांदाच व्याजदरात ०.२५% कपात केली, ज्यामुळे भारतीय शेअर बाजारांवर हा परिणाम दिसून आला. निर्देशांक जोरदार वाढीसह उघडले. सेन्सेक्स जवळजवळ ४०० अंकांनी वधारला. निफ्टी देखील १०० अंकांनी वधारला आणि २५,४०० च्या आसपास व्यवहार करत होता. बँक निफ्टी देखील जवळजवळ २०० अंकांनी वधारला. आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये किंचित वाढ दिसून आली.
आयटी आणि मीडिया सारख्या निर्देशांकांमध्ये वाढ झाली. पीएसयू बँकांचे शेअर्स खाली आले. निफ्टी ५० वर, इन्फोसिस आणि विप्रो सारखे शेअर्स सर्वाधिक वधारले. एचडीएफसी बँक, सन फार्मा, एचयूएल आणि एचडीएफसी लाईफ सारख्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली. दरम्यान, बजाज फायनान्स, हिंडाल्को, अपोलो हॉस्पिटल्स, बजाज फिनझर्स, टाटा स्टील, अॅक्सिस बँक आणि टाटा कंझ्युमरमध्ये घसरण झाली.
सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत ४१५ अंकांनी वाढून ८३,१०८ वर उघडला. निफ्टी १११ अंकांनी वाढून २५,४४१ वर आणि बँक निफ्टी ३०४ अंकांनी वाढून ५५,७९७ वर उघडला. चलन बाजारात, रुपया १५ पैशांनी घसरून ८७.९७/ डॉलर्सवर उघडला.
फेडने वर्षाच्या अखेरीस आणखी दोन दर कपातीचा अंदाज वर्तविला आहे, तर पुढील वर्षी केवळ एक कपात अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी बाजारात चांगली तेजी राहू शकते. तसंही फेडच्या या धोरणानंतर जागतिक बाजारात जोरदार चढ-उतार झाले. अमेरिका आणि आशियाई बाजारांचा मूड वेगळा होता, तर कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीवर दबाव आला.