Bonus Share: गेल्या काही काळापासून शेअर बाजारात अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. अशाच कंपन्यांमध्ये स्मॉलकॅप कंपनी Algoquant Fintech Limited चे नाव आहे. या कंपनीच्या शेअर्सने गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल 25,000% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. शिवाय, कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सदेखील दिले आहेत.
Algoquant Fintech बोनस शेअर
Algoquant Fintech Limited ने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली होती. हे बोनस 1:2 च्या प्रमाणात असेल, म्हणजेच प्रत्येक दोन शेअर्समागे एक अतिरिक्त शेअर दिला जाईल. यासाठी कंपनीने 8 जानेवारी 2025 ही रेकॉर्ड डेट ठेवली आहे.
लाभ कोणाला मिळणार?
कंपनीच्या माहितीनुसार, 8 जानेवारी 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत कंपनीचे भागधारक असलेल्या सर्व गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचा लाभ मिळेल. कंपनीने बोनस इश्यूसाठी 8 जानेवारी 2025 ही रेकॉर्ड तारीख म्हणून निवडली असल्याने, या तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांनाच लाभ मिळेल. बोनस किंवा लाभांश दरम्यान कंपन्या रेकॉर्ड तारखा देतात. या तारखेला ज्या शेअरहोल्डर्सची नावे कंपनीच्या रेकॉर्डमध्ये आढळतात त्यांनाच या इश्यूचा लाभ मिळतो.
Algoquant Fintech शेअरची कामगिरी
Algoquant Fintech चे शेअर्स दुपारी 12:30 च्या सुमारास 2% च्या वाढीसह Rs 1512 वर व्यवहार करत होते. गेल्या 5 दिवसात 7%, 1 महिन्यात 18%, 6 महिन्यात 27% आणि 1 वर्षात 38% परतावा दिला आहे. तर, Algoquant Fintech ने गेल्या 5 वर्षात 25,000% चा दमदार परतावा दिला आहे. या बोनसच्या घोषणेनंतर बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी उत्साह निर्माण होऊ शकतो.
(टीप- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे, कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)