Share Market : शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. हजूर मल्टी प्रोजेक्ट्स या छोट्या कंपनीच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. हजूर मल्टी प्रोजेक्ट्सचे शेअर्स गुरुवारी 13 टक्क्यांहून अधिक वाढून 37.83 रुपयांवर बंद झाले. कंपनीने गेल्या पाच वर्षांत मल्टीबॅगर परतावा दिला आहे. हजूर मल्टी प्रोजेक्ट्सचे शेअर्स 5 वर्षात 25000% पेक्षा जास्त वाढले आहेत. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 15 पैशांवरून 37 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
शेअर्समध्ये 25000% पेक्षा जास्त वाढ
हजूर मल्टी प्रोजेक्ट्सचे शेअर्स 30 मार्च 2020 रोजी 15 पैशांवर होते, तर आज(6 मार्च 2025) शेअर्स 37.83 रुपयांवर बंद झाले. मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 5 वर्षात 25,120%, 4 वर्षांत 11000%, तर 3 वर्षांत 1333% वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 63.90 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 28.41 रुपये आहे.
हजूर मल्टी प्रोजेक्ट्सने स्टॉक स्प्लिट केले आहे. कंपनीने आपले शेअर्समध्ये 10 तुकड्यांमध्ये विभागले आहेत. हजूर मल्टी प्रोजेक्ट्सने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याचे 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या 10 शेअर्समध्ये विभागले आहेत.
एका महिन्यात शेअर्स 26% पेक्षा जास्त घसरले
हजूर मल्टी प्रोजेक्ट्सचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 26% पेक्षा जास्त घसरले आहेत. 6 फेब्रुवारी 2025 रोजी स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 51.68 रुपयांवर होते, तर आज 37.83 रुपयांवर बंद झाले. या वर्षी आतापर्यंत हजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअर्समध्ये 29 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. गेल्या 2 महिन्यांत कंपनीचे शेअर्स 33% नी घसरले आहेत.
(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)