Lokmat Money >शेअर बाजार > गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या २९ रुपयांच्या शेअरने दोन वर्षात ₹ १ लाखाचे केले ₹ १२ लाख

गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या २९ रुपयांच्या शेअरने दोन वर्षात ₹ १ लाखाचे केले ₹ १२ लाख

Share Market: आज हा मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉक फोकसमध्ये आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:45 IST2025-06-10T13:45:11+5:302025-06-10T13:45:48+5:30

Share Market: आज हा मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉक फोकसमध्ये आहे.

Share Market: A share of Rs 29 made ₹ 1 lakh to ₹ 12 lakh in two years | गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या २९ रुपयांच्या शेअरने दोन वर्षात ₹ १ लाखाचे केले ₹ १२ लाख

गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या २९ रुपयांच्या शेअरने दोन वर्षात ₹ १ लाखाचे केले ₹ १२ लाख

Share Market: शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने किंमत २ वर्षांपूर्वी फक्त २९ रुपये होती, आता ती ३८२ रुपये झाली आहे. 

या मल्टीबॅगर स्टॉकचे नाव TIL Ltd असून, आज हा स्मॉल-कॅप स्टॉक फोकसमध्ये आहे. स्टॉक BSE वर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ४.९९% वाढीसह ३८२.०५ रुपयांवर व्यवहार करत आहे. विशेष म्हणजे, गेल्या १ महिन्यात कंपनीच्या स्टॉकने ८२.९७% पर्यंत परतावा दिला आहे. तर, ३ महिन्यांत १०२.७०% आणि ३ वर्षांत १०९६.०६% परतावा दिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप २,५२९.२१ कोटी रुपये आहे.

१ लाखाचे केले १२ लाख
NSE वर या स्टॉकने २ वर्षात या स्टॉकने ११००% परतावा दिला आहे. जर कोणी २ वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज एकूण रक्कम १२,४१,९७९ रुपये झाली असती.

कंपनीचा EBITDA
कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत ११०.९ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, जो आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ८३ कोटी रुपयांवरून वार्षिक आधारावर २४०% आणि तिमाहीत ३४% वाढला. 

चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा
आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा (PAT) ९.८ कोटी रुपये होता, जो तिसऱ्या तिमाहीत ३.७ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत १६८.७ कोटी रुपये होता. 

(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Share Market: A share of Rs 29 made ₹ 1 lakh to ₹ 12 lakh in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.