lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भातील घोषणेनं रॉकेट बनला शेअर, गुंतवणूकदार मालामाल; ₹100 हून कमी आहे किंमत

इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भातील घोषणेनं रॉकेट बनला शेअर, गुंतवणूकदार मालामाल; ₹100 हून कमी आहे किंमत

महत्वाचे म्हणजे 6 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टिमच्या बोर्डाची बैठक होणार आहे. या बैठकीत डिसेंबर तिमाहीचे निकाल जारी केले जातील.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 07:29 PM2024-02-01T19:29:19+5:302024-02-01T19:30:28+5:30

महत्वाचे म्हणजे 6 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टिमच्या बोर्डाची बैठक होणार आहे. या बैठकीत डिसेंबर तिमाहीचे निकाल जारी केले जातील.

servotech power systems share become rocket after ev charger point announcement Price is less than rs100 | इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भातील घोषणेनं रॉकेट बनला शेअर, गुंतवणूकदार मालामाल; ₹100 हून कमी आहे किंमत

इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भातील घोषणेनं रॉकेट बनला शेअर, गुंतवणूकदार मालामाल; ₹100 हून कमी आहे किंमत

आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जरसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. त्या म्हणाल्या, चार्जिंगसंदर्भातील पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहन (EV) तंत्राचा विस्तार करेल आणि सार्वजनिक वाहतूक नेटवर्कसाठी ई-बसना प्रोत्साहन दिले जाईल.

सार्वजनिक परिवहन वाढविण्यासंदर्भात लक्ष केंद्रित करून सरकार इलेक्ट्रिक बसेसचा व्यापक अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी तयार आहे. ई-बस ऑपरेटर्समध्ये विश्वास वाढविला जाईल. पेमेंट सुरक्षा यंत्रणेच्या अंमलबजावणीद्वारे हे सुलभ केले जाईल. निर्मला सीतारामन यांच्या या घोषणेनंतर, इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित कंपन्यांचे शेअर रॉकेट बनले आहेत. यातील एक शेअर आहे सर्व्होटेक पॉवर सिस्टिम्सचा आहे.

अशी आहे शेअरची किंमत -
गेल्या 90.60 रुपयांच्या क्लोजिंग प्राइसच्या तुलनेत हा शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 95.10 रुपयांवर पोहोचला आहे. 21 जुलै 2023 रोजी या शेअरची किंमत 100 रुपयांवर पोहोचली. हा शेअर 29 मार्च 2023 रोजी 16.48 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होता. कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,02,234.23 कोटी रुपये एवढे आहे.

महत्वाचे म्हणजे 6 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टिमच्या बोर्डाची बैठक होणार आहे. या बैठकीत डिसेंबर तिमाहीचे निकाल जारी केले जातील.

(टीप   येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: servotech power systems share become rocket after ev charger point announcement Price is less than rs100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.