Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी; सरकारी बँका आणि आयटी शेअर्समध्ये जोर, सेन्सेक्स ८३,४०० पार

बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी; सरकारी बँका आणि आयटी शेअर्समध्ये जोर, सेन्सेक्स ८३,४०० पार

Share Market : जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार तेजीत राहिला. व्यवहाराच्या शेवटी, बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील अंदाजे ४६८.६ लाख कोटींवरून सुमारे ४७० लाख कोटींवर पोहोचले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:18 IST2026-02-17T16:18:58+5:302026-02-17T16:18:58+5:30

Share Market : जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार तेजीत राहिला. व्यवहाराच्या शेवटी, बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील अंदाजे ४६८.६ लाख कोटींवरून सुमारे ४७० लाख कोटींवर पोहोचले.

Sensex Rises for 2nd Day, Nifty Closes at 25,725: PSU Banks and IT Stocks Lead the Way | बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी; सरकारी बँका आणि आयटी शेअर्समध्ये जोर, सेन्सेक्स ८३,४०० पार

बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी; सरकारी बँका आणि आयटी शेअर्समध्ये जोर, सेन्सेक्स ८३,४०० पार

Share Market : भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. दिग्गज कंपन्यांच्या शेअर्ससोबतच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये झालेल्या चौफेर गुंतवणुकीमुळे सर्वच प्रमुख निर्देशांक 'हिरव्या' निशाणात बंद झाले. दिवसभराच्या चढ-उतारानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७४ अंकांच्या वाढीसह ८३,४५१ वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४३ अंकांनी वधारून २५,७२५ च्या पातळीवर पोहोचला.

'या' दिग्गजांनी सावरला बाजार
आजच्या तेजीमध्ये प्रामुख्याने लार्सन अँड लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, आयटीसी, एसबीआय आणि अदानी पोर्ट यांसारख्या हेवीवेट शेअर्सचा मोठा वाटा होता.
बँकिंग क्षेत्र : निफ्टी बँक २२५ अंकांनी वधारून ६१,१७४ वर बंद झाला. विशेषतः सरकारी बँकांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी खरेदी झाल्याने हा निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक वाढला.
ब्रॉडर मार्केट : मिडकॅप इंडेक्स १५९ अंकांनी वधारून ५९,८८२ वर पोहोचला, जे गुंतवणूकदारांचा बाजारावरील वाढता विश्वास दर्शवते.

'इन्फोसिस' आणि 'न्यूजेन'ची आयटी क्षेत्रात बाजी
आयटी क्षेत्रात आज संमिश्र वातावरण असले तरी काही शेअर्सनी लक्ष वेधून घेतले. 'Anthropic' या एआय कंपनीसोबत सहकार्याची घोषणा केल्यामुळे इन्फोसिसचा शेअर २ टक्क्यांनी वधारला. तर गेल्या ५ दिवसांच्या घसरणीला पूर्णविराम देत न्यूजेन सॉफ्टवेअर या शेअरने आज १५ टक्क्यांची तुफान झेप घेतली.

ऑर्डर आणि भागीदारीमुळे 'या' शेअर्समध्ये ॲक्शन
KNR Construction: चेन्नईमध्ये २,१६३ कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाल्याने हा शेअर ६ टक्क्यांनी वधारला.
Delhivery : 'RIDEV' सोबत १५० इलेक्ट्रिक वाहनांसाठी केलेल्या करारामुळे या शेअरमध्ये ४ टक्क्यांची तेजी आली.

ओला इलेक्ट्रिकला 'सिटी'चा झटका
तेजीच्या लाटेतही काही शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. 'Citi' या जागतिक ब्रोकरेज फर्मने रेटिंग घटवून विक्री करण्याचा सल्ला दिल्याने शेअर ३ टक्क्यांनी कोसळला. सिटीने या शेअरसाठी केवळ २७ रुपयांचे टार्गेट दिले आहे. प्रवर्तक 'कामा होल्डिंग्स'ने ३% हिस्सा विकल्याच्या बातमीमुळे SRF ४ टक्क्यांनी पडला, तर Kama Holdings ४ टक्क्यांनी वधारला.

वाचा - अमेरिकेच्या शेजारी देशात भारताच्या तुलनेत १०० पट जास्त महागाई; 'हे' १० देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : बाजार में लगातार दूसरे दिन तेजी; सरकारी बैंक, आईटी शेयरों में उछाल

Web Summary : भारतीय शेयर बाजार में तेजी जारी, बैंक और आईटी शेयरों में उछाल। सेंसेक्स 83,400 के पार, इंफोसिस और न्यूजेन आईटी में आगे। केएनआर कंस्ट्रक्शन और डेल्हीवेरी के शेयरों में भी तेजी। ओला इलेक्ट्रिक को झटका लगा।

Web Title : Market Rises Second Day: Bank & IT Stocks Surge, Sensex Up

Web Summary : Indian stock market continues its upward trend, fueled by bank and IT stocks. Sensex crossed 83,400, with Infosys and Newgen leading IT gains. KNR Construction and Delhivery shares also saw action due to new orders and partnerships, while Ola Electric faced a setback.