Stock Market : नव्या आठवड्याची सुरुवात शेअर बाजाराने जोरदार तेजीसह केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील शेअर्समध्ये आलेल्या खरेदीच्या लाटेमुळे दोन्ही मुख्य निर्देशांक हिरव्या निशाण्यावर बंद होण्यात यशस्वी झाल्या. दिवसभरात सेन्सेक्सने ८३ हजार अंकांचा टप्पा ओलांडून गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला.
निर्देशांकांची स्थिती: निफ्टी २५,७०० च्या पार
सोमवारी बाजार उघडल्यापासूनच बुल्सचे वर्चस्व पाहायला मिळाले. सेन्सेक्स सकाळी ८२,९०६ वर उघडलेला सेन्सेक्स दिवसअखेर ४८० अंकांच्या वाढीसह ८३,२९४ वर बंद झाला. तर निफ्टीने २५,६७८ वर सलामी दिली आणि १४२ अंकांच्या वाढीसह २५,७०३ या स्तरावर स्थिरावला. मुख्य निर्देशांकांच्या तुलनेत मिडकॅपमध्ये ०.२१% ची घसरण दिसली, तर स्मॉलकॅप इंडेक्स मात्र ०.५१% च्या वाढीसह बंद झाला.
कुणी कमावले, कुणी गमावले?
टॉप गेनर्स (तेजी असणारे शेअर्स)
१. अदानी पोर्ट्स: २.९४%
२. कोटक बँक: २.२२%
३. डॉ. रेड्डीज: २.११%
४. एचडीएफसी लाईफ: १.९०%
५. नेस्ले इंडिया: १.६५%
टॉप लूजर्स (घसरण झालेले शेअर्स)
१. क्वालिटी वॉल: २.८२%
२. हिंडाल्को: २.०९%
३. इन्फोसिस: १.९०%
४. विप्रो: १.९०%
५. टेक महिंद्रा: १.१०%
क्षेत्रीय निर्देशांकांची कामगिरी
- बँकिंग आणि ऑटो क्षेत्रात उत्साह होता, तर आयटी आणि मेटल क्षेत्रात नफेखोरी दिसून आली.
- तेजी असलेले क्षेत्र : निफ्टी पीएसयू बँक (१.३६%), फायनान्शिअल सर्व्हिसेस (०.८७%), इन्फ्रा (०.८५%) आणि ऑटो (०.८३%) क्षेत्रात चांगली खरेदी झाली.
- घसरण झालेले क्षेत्र : निफ्टी आयटीमध्ये सर्वाधिक १.४२% ची घट नोंदवण्यात आली. याशिवाय डिफेन्स (०.३८%) आणि मेटल (०.२३%) क्षेत्रातही घसरण झाली.
