Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > टेक्सटाईल अन् ज्वेलरी शेअर्समध्ये २०% ची उसळी; एका दिवसात १२ लाख कोटींची संपत्ती वाढली

टेक्सटाईल अन् ज्वेलरी शेअर्समध्ये २०% ची उसळी; एका दिवसात १२ लाख कोटींची संपत्ती वाढली

India US Trade Deal : बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १२ लाख कोटींपेक्षा जास्त वाढले. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील रॅलींमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:15 IST2026-02-03T16:15:19+5:302026-02-03T16:15:19+5:30

India US Trade Deal : बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १२ लाख कोटींपेक्षा जास्त वाढले. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील रॅलींमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला.

Sensex Rallies 2073 Points on India-US Trade Deal: Investors Gain ₹12 Lakh Crore. | टेक्सटाईल अन् ज्वेलरी शेअर्समध्ये २०% ची उसळी; एका दिवसात १२ लाख कोटींची संपत्ती वाढली

टेक्सटाईल अन् ज्वेलरी शेअर्समध्ये २०% ची उसळी; एका दिवसात १२ लाख कोटींची संपत्ती वाढली

India-US Trade Deal : भारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक व्यापारी कराराने भारतीय शेअर बाजारात आज अक्षरशः चैतन्य फुंकले. मागील अनेक महिन्यांची मरगळ झटकून काढत सेन्सेक्स आणि निफ्टीने २ टक्क्यांहून अधिक मोठी झेप घेतली. १२ मे २०२५ नंतरची ही एका दिवसातील सर्वात मोठी वाढ ठरली असून, मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात १२ लाख कोटी रुपयांची प्रचंड भर पडली आहे.

प्रमुख निर्देशांकांची कामगिरी

  • सेन्सेक्स : २०७३ अंकांच्या विक्रमी वाढीसह ८३,७३९ वर बंद झाला.
  • निफ्टी ५० : ६३९ अंकांची उसळी घेत २५,७२८ च्या पातळीवर स्थिरावला.
  • बँक निफ्टी : बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे हा निर्देशांक ६०,००० चा टप्पा पार करून ६०,०४१ वर बंद झाला.

व्यापारी कराराचे 'हे' सेक्टर ठरले मानकरी
अमेरिकेशी झालेल्या करारामुळे ज्या क्षेत्रांचा थेट व्यापार अमेरिकेशी निगडित आहे, अशा शेअर्समध्ये आज २० टक्क्यांपर्यंतची तेजी पाहायला मिळाली. कापड उद्योग आणि झींगा निर्यातीतील कंपन्यांना लॉटरी लागली. गोकलदास एक्सपोर्ट्स, फेझ थ्री, अवंती फीड्स आणि वेल्सपन लिव्हिंग यांसारखे शेअर्स २० टक्क्यांच्या 'अप्पर सर्किट'ला धडकले. दागिने क्षेत्रातील गोल्डियम इंटरनॅशनल आणि राजेश एक्सपोर्ट्समध्येही २० टक्क्यांची तुफानी तेजी नोंदवण्यात आली. केमिकल आणि फायनान्स क्षेत्रात UPL ६ टक्क्यांनी वधारला, तर मॅनेजमेंटच्या सकारात्मक कॉमेंट्रीमुळे चोलामंडलम फायनान्स ७ टक्क्यांनी वधारला.

मिडकॅपचा 'जोश' आणि निकाल फॅक्टर
मिडकॅप इंडेक्समध्येही आज १६४० अंकांची मोठी वाढ झाली. नव्या युगातील कंपन्यांपैकी एथर एनर्जी आणि मोबीक्वीकचे शेअर्स त्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या दमदार निकालानंतर २० टक्क्यांनी वधारले.

वाचा - वेदांताचे अनिल अग्रवाल ७५% संपत्ती 'या' क्षेत्रासाठी करणार दान; मुलाच्या स्मरणार्थ घेतला निर्णय

तेजीतही 'या' शेअर्सना उतरती कळा
पीबी फिनटेक : आंतरराष्ट्रीय अधिग्रहणासाठी फंड उभारण्याच्या बातमीमुळे हा शेअर ६ टक्क्यांनी घसरला.
वरुण बेवरेजेस : तिसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत लागल्याने हा शेअर उच्चांकी पातळीवरून ९ टक्क्यांनी कोसळला.
 

Web Title : टेक्सटाइल, ज्वेलरी शेयरों में 20% उछाल; ₹12 लाख करोड़ बढ़ी संपत्ति।

Web Summary : भारत-अमेरिका व्यापार समझौते से बाजार में तेजी। सेंसेक्स 2073 अंक ऊपर, निफ्टी 639 अंक ऊपर। टेक्सटाइल, ज्वेलरी शेयरों में उछाल। मिडकैप इंडेक्स में वृद्धि; कुछ शेयरों में गिरावट।

Web Title : Textile, jewelry stocks surge 20%; wealth up ₹12 lakh crore.

Web Summary : India-US trade deal fuels market rally. Sensex jumps 2073 points, Nifty up 639. Textile, jewelry shares soar. Midcap index surges; some shares decline.