Stock Market : मध्य-पूर्वेतील युद्धाचे सावट आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी व्यवहार बंद होताना बीएसई सेन्सेक्स ८२९.२९ अंकांनी (१.०८%) कोसळून ७६,०३४.४२ वर स्थिरावला, तर निफ्टी ५० इंडेक्स २२७.७० अंकांनी (०.९५%) घसरून २३,६३९.१५ या स्तरावर बंद झाला. रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील कंपन्यांची तेजी वगळता संपूर्ण बाजारात आज 'लाल' निशाण पाहायला मिळाले.
बाजार आकड्यांच्या नजरेतून
सेंसेक्सच्या ३० पैकी तब्बल २४ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली, तर केवळ ६ शेअर्स हिरव्या निशाणात बंद झाले. तर निफ्टीमधील ५० पैकी ४० कंपन्यांचे शेअर्स घसरले, तर केवळ १० कंपन्यांना आपली वाढ टिकवता आली.
आजचे 'टॉप गेनर्स' (तेजीत असलेले शेअर्स)
बाजारात चौफेर विक्री सुरू असतानाही ऊर्जा आणि आयटी क्षेत्रातील काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना दिलासा दिला.
- एनटीपीसी : २.७९% वाढीसह सर्वाधिक नफा कमावणारा शेअर.
- पॉवर ग्रिड : १.६४% तेजी.
- टेक महिंद्रा & एचसीएल टेक : प्रत्येकी १.६१% वाढ.
- रिलायन्स इंडस्ट्रीज : ०.०५% (अल्प वाढ).
- सन फार्मा : ०.०१% (अल्प वाढ).
आजचे 'टॉप लूजर्स' (घसरण झालेले शेअर्स)
ऑटो आणि बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना आज विक्रीचा सर्वात मोठा तडाखा बसला.
- महिंद्रा अँड महिंद्रा : ४.२३% घसरणीसह दिवसातील सर्वात मोठा लूजर.
- मारुती सुझुकी : ३.६०% घसरण.
- बजाज फायनान्स : ३.३१% घसरण.
- एल अँड टी : ३.०६% घसरण.
- अल्ट्राटेक सिमेंट : २.९०% घसरण.
- बँकिंग सेक्टर: आयसीआयसीआय बँक (२.१९%), कोटक महिंद्रा बँक (२.१३%) आणि ॲक्सिस बँक (२.०१%) या शेअर्समध्येही मोठी विक्री झाली.
रिन्यूएबल एनर्जीमध्ये 'करंट'
एकीकडे पारंपरिक ऊर्जा आणि ऑटो शेअर्स पडत असताना, रिन्यूएबल एनर्जी (पुनर्नवीकरणीय ऊर्जा) क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मात्र गुंतवणूकदारांनी आज रस दाखवला. भविष्यातील इंधन सुरक्षेच्या चिंतेमुळे या क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली.
