Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > ट्रम्प यांचा 'ब्रेक' पण इराण आपल्या अटींवर ठाम! बाजारात पुन्हा मंदीचे सावट; गुंतवणूकदारांनी काय करावं?

ट्रम्प यांचा 'ब्रेक' पण इराण आपल्या अटींवर ठाम! बाजारात पुन्हा मंदीचे सावट; गुंतवणूकदारांनी काय करावं?

Stock Markets : शेअर बाजारात २ दिवस वाढ झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांची पळापळ झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:31 IST2026-03-27T12:28:24+5:302026-03-27T12:31:08+5:30

Stock Markets : शेअर बाजारात २ दिवस वाढ झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांची पळापळ झाली.

Sensex Plunges 1,200 Points, Nifty Breaks Below 23,000 Level on March 27 | ट्रम्प यांचा 'ब्रेक' पण इराण आपल्या अटींवर ठाम! बाजारात पुन्हा मंदीचे सावट; गुंतवणूकदारांनी काय करावं?

ट्रम्प यांचा 'ब्रेक' पण इराण आपल्या अटींवर ठाम! बाजारात पुन्हा मंदीचे सावट; गुंतवणूकदारांनी काय करावं?

Stock Markets : गेल्या दोन दिवसांतील तेजीला पूर्णविराम देत भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीवर विक्रीचा प्रचंड दबाव दिसून आला. सेन्सेक्स १२०० अंकांच्या पडझडीसह ७४,००० च्या स्तरावर आला, तर निफ्टी ३६१ अंकांनी घसरुन २३,००० च्या महत्त्वपूर्ण पातळीच्या खाली गेला. युद्धाची अनिश्चितता आणि कमकुवत जागतिक संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी आज मोठ्या प्रमाणावर नफावसुली केली.

बाजारातील घसरणीची ७ प्रमुख कारणे
१. नफावसुलीचा तडाखा: २४ आणि २५ मार्च रोजी बाजार ३.५ टक्क्यांनी सावरला होता. उच्च पातळीवर अडकलेल्या गुंतवणूकदारांनी आज नफा पदरात पाडून घेण्यासाठी विक्रीचा सपाटा लावला.

२. मध्य-पूर्वेतील तणाव कायम : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याला ६ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली असली, तरी इराणकडून नरमाईचे संकेत मिळालेले नाहीत. या अनिश्चिततेचा फटका बाजाराला बसला.

३. जागतिक बाजारातील विक्री : अमेरिकन बाजार २ टक्क्यांनी घसरल्याने त्याचे पडसाद आशियाई बाजारात उमटले. दक्षिण कोरियाचा बाजार २.७% तर तैवानचा बाजार १.४% टक्क्यांनी कोसळला.

४. कच्च्या तेलाचा भडका : ब्रेंट क्रूडचे भाव पुन्हा उसळले असून ते १०८ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. भारतासारख्या आयातदार देशासाठी ही चिंतेची बाब आहे.

५. रुपयाचा ऐतिहासिक निचांक : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ९४.४४ या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर गेला आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धानंतर रुपयात ४ टक्क्यांची घसरण झाली आहे.

६. परकीय गुंतवणूकदारांची पाठ : बाजार वधारत असतानाही परकीय गुंतवणूकदार सलग विक्री करत आहेत, ज्यामुळे बाजारातील वाढ टिकून राहणे कठीण झाले आहे.

७. India VIX मध्ये ७.५% वाढ : बाजारातील अस्थिरता दर्शवणारा 'इंडिया विक्स' २६.५३ च्या स्तरावर गेला आहे. हे नजीकच्या काळात बाजारात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत आहेत.

वाचा - तेल कंपन्यांना केंद्राचा 'बूस्टर डोस'! एका निर्णयाने शेअर बाजारात 'ऑईल' स्टॉक्समध्ये ४ टक्क्यांची तेजी

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : ट्रम्प का 'ब्रेक,' ईरान अडिग; बाजार में गिरावट; निवेशकों के लिए सलाह।

Web Summary : वैश्विक अनिश्चितता, मध्य पूर्व तनाव और बढ़ते कच्चे तेल की कीमतों के कारण भारतीय शेयर बाजार में भारी गिरावट आई है। निवेशक बेच रहे हैं, रुपया रिकॉर्ड निचले स्तर पर है और अस्थिरता बढ़ रही है। विशेषज्ञों की सावधानी बरतने की सलाह।

Web Title : Trump's 'pause,' Iran firm; market slump; investor advice needed.

Web Summary : Indian stock market faces a sharp decline due to global uncertainty, Middle East tensions, and rising crude oil prices. Investors are selling, the rupee is at a record low, and volatility is increasing. Experts advice caution.