Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी

सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी

Share Market Today: सोमवार, १५ डिसेंबर रोजी सुरुवातीच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारांमध्ये चांगली सुधारणा दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनीही सुरुवातीच्या बहुतेक घसरणीतून सावरले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 16:59 IST2025-12-15T16:59:28+5:302025-12-15T16:59:28+5:30

Share Market Today: सोमवार, १५ डिसेंबर रोजी सुरुवातीच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारांमध्ये चांगली सुधारणा दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनीही सुरुवातीच्या बहुतेक घसरणीतून सावरले.

Sensex, Nifty Recover 3 Key Reasons for Market Rebound, Including Value Buying and Strong FMCG Rally | सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी

सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी

Share Market : आज, सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार सुरुवातीला घसरणीसह उघडला, पण दिवसाच्या दुसऱ्या सत्रात बाजार सावरला आणि रिकव्हरी होताना दिसली. जागतिक बाजारातील सुस्ती आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे सकाळी बाजारात दबाव होता, पण तीन प्रमुख कारणांमुळे बाजारातील नकारात्मकता दूर झाली आणि गुंतवणूकदारांनी खरेदीला सुरुवात केली. पण शेवटच्या टप्प्यात नफावसुलीमुळे प्रमुख निर्देशांक किरकोळ घसरणीसह खाली आले.

खालच्या पातळीवर 'व्हॅल्यू बाइंग'
सुरुवातीच्या घसरणीनंतर अनेक क्षेत्रांमधील शेअर्सच्या किमती आकर्षक झाल्या होत्या. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या खालच्या पातळीवर व्हॅल्यू बाइंग करण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने बँक निफ्टी, कंझ्युमर ड्यूरेबल्स, एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. यामुळे बाजारातील जोखीम घेण्याची गुंतवणूकदारांची तयारी वाढली आणि बाजार सावरला.

अमेरिकन बाजारातून सकारात्मक संकेत
अमेरिकेच्या फ्युचर्स मार्केटमधून मिळालेल्या सकारात्मक संकेतांनी भारतीय शेअर बाजारातील वातावरण सुधारले. अमेरिकेचे फ्यूचर्स ०.३ टक्क्यांपर्यंत वाढून व्यवहार करत होते, ज्यामुळे वॉल स्ट्रीटमध्ये मजबूत सुरुवात होण्याची अपेक्षा वाढली. या सकारात्मक जागतिक संकेतामुळे स्थानिक गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.

एफएमसीजी शेअर्समध्ये मोठी खरेदी
एफएमसीजी क्षेत्रात आलेल्या मजबूत तेजीने बाजाराच्या रिकव्हरीमध्ये मोठे योगदान दिले. गेल्या काही सत्रांमध्ये घसरण झाल्यानंतर, आज एफएमसीजी शेअर्समध्ये पुन्हा मोठी उसळी दिसून आली. ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि मॅरिको सारखे शेअर्स या क्षेत्रात आघाडीवर होते आणि ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. या क्षेत्रातील जोरदार खरेदीमुळे बाजार बंद होताना घसरण किरकोळ राहिली.

आजचे 'टॉप गेनर्स'
आज सेन्सेक्समध्ये हिंदुस्तान यूनिलीव्हर चा शेअर सर्वात मोठा विजेता ठरला.
हिंदुस्तान यूनिलीव्हरमध्ये : १.३७ टक्क्यांची सर्वाधिक वाढ.
इतर प्रमुख वाढलेले शेअर्स

  • ट्रेंट (१.११%)
  • एचसीएल टेक (०.६८%)
  • इन्फोसिस (०.५७%)
  • एशियन पेंट्स (०.५३%)
  • टाटा स्टील (०.५२%)
  • टीसीएस (०.४२%)
  • एल अँड टी (०.४०%)
  • कोटक महिंद्रा बँक (०.३७%)
  • आयटीसी (०.३७%)
  • एसबीआय (०.३३%)
  • रिलायन्स इंडस्ट्रीज (०.०२%)

वाचा - भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा

आजचे 'टॉप लूजर्स'

  • महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये आज सर्वाधिक घसरण झाली.
  • महिंद्रा अँड महिंद्रा : १.९२ टक्क्यांची सर्वाधिक घसरण.
  • इतर प्रमुख घसरलेले शेअर्स
  • मारुती सुझुकी (०.८९%)
  • अदानी पोर्ट्स (०.८१%)
  • बजाज फिनसर्व्ह (०.७५%)
  • टायटन (०.६४%)
  • एचडीएफसी बँक (०.५६%)
  • भारती एअरटेल (०.५४%)
  • बजाज फायनान्स (०.५३%)
  • पॉवरग्रिड (०.५३%)
  • एनटीपीसी (०.३७%)
  • टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स (०.३०%)
  • अल्ट्राटेक सिमेंट (०.२५%)    
     

Web Title : शुरुआती नुकसान के बाद बाजार में सुधार: पुनरुद्धार के तीन कारण।

Web Summary : भारतीय शेयर बाजार शुरुआती गिरावट के बाद एफएमसीजी जैसे क्षेत्रों में वैल्यू बाइंग और अमेरिकी बाजारों से सकारात्मक संकेतों के कारण वापस उछला। एफएमसीजी शेयरों ने सुधार का नेतृत्व किया, हालांकि देर से मुनाफ़ा वसूली के कारण मामूली गिरावट आई।

Web Title : Market recovers after early losses: Three reasons behind the rebound.

Web Summary : Indian stock market rebounded after an initial dip due to value buying in sectors like FMCG and positive cues from US markets. FMCG shares led the recovery, though late profit-booking caused a slight decline.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.