Share Market Today : सोमवारी भारतीय शेअर बाजारात दिवसभर जोरदार चढ-उतार पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात मोठी तेजी दर्शवल्यानंतर, बाजारात मोठी नफावसुली झाली, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक त्यांची संपूर्ण वाढ गमावून लाल निशाणीवर बंद झाले. या घसरणीपूर्वी, व्यवहारादरम्यान निफ्टीने २६,३२५ चा तर सेन्सेक्सने ८५,८५० चा नवा सर्वोच्च उच्चांक गाठला होता. मात्र, बाजारातील ही तेजी टिकू शकली नाही.
ऑटो सेक्टरची जोरदार कामगिरी
आज सेक्टोरल स्तरावर मिळतेजुळते संकेत दिसून आले. पण, ऑटो शेअर्समध्ये मजबुती कायम राहिली आणि ऑटो इंडेक्स १% नी वाढला. टाटा मोटर्स आणि मारुतीच्या नोव्हेंबर महिन्यातील विक्रीचे आकडे अपेक्षितपेक्षा चांगले राहिल्याने या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. आयशर मोटर्स देखील हिरव्या निशाणीवर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी कमावले १३,००० कोटी रुपये
आज बाजारात निर्देशांक घसरले असले तरी, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल वाढले. काल (मागील ट्रेडिंग दिवस) ₹४७४.३५ लाख कोटी होते, ते आज वाढून ४७४.४८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे १३,००० कोटी रुपयांची वाढ झाली.
टॉप ५ वाढलेले शेअर्स
बीएसई सेन्सेक्सच्या ३० पैकी १६ शेअर्समध्ये आज वाढ नोंदवली गेली.
- टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल : १.९३% वाढ
- मारुती सुझुकी : १.३७% वाढ
- भारत इलेक्ट्रॉनिक्स : १.०५% वाढ
- कोटक महिंद्रा बँक : ०.९८% वाढ
- एचसीएल टेक : ०.९५% वाढ
टॉप ५ घसरलेले शेअर्स
सेन्सेक्सचे बाकीचे १४ शेअर्स लाल निशाणीवर बंद झाले:
- बजाज फायनान्स : १.६५% घसरण
- सन फार्मा : १.२८% घसरण
- ट्रेंट : १.१०% घसरण
- स्टेट बँक ऑफ इंडिया : ०.८८% घसरण
- बजाज फिनसर्व : ०.५५% घसरण
वाचा - GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
व्यवहाराचे संपूर्ण चित्र
आज बीएसईवर एकूण ४,४५५ शेअर्समध्ये व्यवहार झाला. यापैकी १,८४२ शेअर्समध्ये तेजी तर २,४०१ शेअर्समध्ये घसरण झाली, तर २१२ शेअर्स सपाट बंद झाले. विशेष म्हणजे, आज १५१ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला, तर १९७ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा नीचांक (गाठला.
