Stock Market Outlook: जगभरातील शेअर बाजार गेल्या काही काळापासून मोठी घसरण दिसून येत आहे. भारताचा देशांतर्गत शेअर बाजारही यापासून दूर राहिलेला नाही. जागतिक स्तरावरील वाढता तणाव आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ प्लॅनमुळे जगभरातील शेअर बाजार अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहेत. पण आता देशांतर्गत शेअर बाजाराचे भवितव्य बदलणार आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीशी संबंधित तज्ज्ञांच्या मते डिसेंबर २०२५ पर्यंत सेन्सेक्स १,०५,००० ची पातळी गाठू शकेल. हे प्रमाण सध्याच्या पातळीपेक्षा ४१ टक्क्यांनी अधिक आहे.
काय म्हणाले एक्सपर्ट?
रिपोर्टनुसार, रिस्क-रिवॉर्ड घटक भारताच्या शेअर बाजाराच्या बाजूनं असेल, असं तज्ज्ञांचं मत आहे. अशा परिस्थितीत सेन्सेक्स या वर्षाच्या अखेरीस ९३ हजारांपर्यंत पोहोचू शकतो. जो सध्याच्या सेन्सेक्सच्या पातळीपेक्षा २५ टक्क्यांहून अधिक आहे. त्याचबरोबर बाजारातील मंदीची स्थिती कायम राहिल्यास डिसेंबर अखेर सेन्सेक्स ७०,००० च्या पातळीपर्यंत येऊ शकतो.
मॉर्गन स्टॅनलीचे भारतीय संशोधन प्रमुख रिद्धम देसाई यांनी आपल्या सहकाऱ्याच्या मदतीनं एक रिपोर्ट तयार केला आहे "आमचा अंदाज आहे की भारतीय शेअर बाजारातील मंदी या वर्षी ती खाली राहू शकते.” ब्रोकरेज हाऊसशी संबंधित एका तज्ज्ञाचा असा विश्वास आहे की कोरोना महासाथीच्या मूल्यांकन खूप आकर्षक झालं आहे.
डिफेन्सिव्ह, स्मॉलकॅप, मिडकॅप आणि लार्जकॅप शेअर्सच्या कामगिरीवर देसाई उत्साही आहेत. तर दुसरीकडे तज्ज्ञांनी फायनान्शिअल, कन्झुनमर फोकस्ड स्टॉक्स, इंडस्ट्रीयल आणि टेक क्षेत्राला ओव्हरवेट रेटिंग दिलं आहे.
हे शेअर्स ओव्हरवेट
महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, ट्रेंट, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, टायटन कंपनी, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट आणि इन्फोसिस या कंपन्यांना देसाई यांनी ओव्हरवेट स्टॉक म्हटलं आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)