Share Market : भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. परिणामी दोन्ही प्रमुख निर्देशांक हिरव्या निशाणीवर बंद झाले. सेन्सेक्समध्ये ४५० अंकांची तेजी नोंदवण्यात आली आणि तो ०.५३ टक्क्यांच्या वाढीसह ८५,२६७ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टीमध्येही १४८ अंकांची वाढ झाली आणि तो ०.५७ टक्क्यांच्या तेजीसह २६,०४६ च्या पातळीवर बंद झाला.
ब्रॉडर मार्केटची उत्कृष्ट कामगिरी
बेंचमार्क निर्देशांकांच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांची कामगिरी खूपच दमदार राहिली. बीएसई मिडकॅपमध्ये १.१४ टक्के तेजी दिसली. तर बीएसई स्मॉलकॅपमध्ये ०.६४ टक्के तेजी दिसून आली.
निफ्टी ५० मधील टॉप गेनर्स आणि लूजर्स
- हिंडाल्को : ३.३७ टक्के वाढ
- टाटा स्टील : ३.३२ टक्के वाढ
- इटरनल : २.४५ टक्के वाढ
- अल्ट्राटेक सिमेंट्स : २.१९ टक्के वाढ
- नेस्ले इंडिया : १.९२ टक्के वाढ
टॉप लूजर्स (सर्वाधिक घसरण झालेले शेअर्स)
- हिंदुस्तान युनिलिव्हर : १.९६ टक्के घसरण (सर्वाधिक नुकसान)
- सन फार्मा : ०.७६ टक्के घसरण
- आयटीसी : ०.७० टक्के घसरण
- मॅक्स हेल्थकेअर : ०.६१ टक्के घसरण
- एशियन पेंट्स : ०.५३ टक्के घसरण
वाचा - चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
