Lokmat Money >शेअर बाजार > एका बातमीने बाजारात गोंधळ! गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटींचे नुकसान, भविष्यासाठी वाईट बातमी

एका बातमीने बाजारात गोंधळ! गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटींचे नुकसान, भविष्यासाठी वाईट बातमी

Why Market Fell Today: सोमवारी निफ्टी-सेन्सेक्स सुमारे १.५% च्या घसरणीसह बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही मोठ्या घसरणीसह बंद झाले. PSE आणि PSU बँक निर्देशांक सर्वाधिक घसरले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:19 IST2025-01-06T16:19:49+5:302025-01-06T16:19:49+5:30

Why Market Fell Today: सोमवारी निफ्टी-सेन्सेक्स सुमारे १.५% च्या घसरणीसह बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही मोठ्या घसरणीसह बंद झाले. PSE आणि PSU बँक निर्देशांक सर्वाधिक घसरले.

sensex fell more than 1200 investors lost 11 lakh crores today bad news for the future | एका बातमीने बाजारात गोंधळ! गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटींचे नुकसान, भविष्यासाठी वाईट बातमी

एका बातमीने बाजारात गोंधळ! गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटींचे नुकसान, भविष्यासाठी वाईट बातमी

Share Market Crash : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अत्यंत वाईट होता. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी बाजार हिरव्या रंगात उघडला खरा, पण एका बातमीने बाजारात खळबळ उडाली. HMPV या चीनी विषाणूचा रुग्ण देशात आढळल्यानंतर बाजारा मोठी विक्री झाली. काही वेळातच गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. सेन्सेक्स आणि निफ्टी ५० आज १.५% पेक्षा जास्त घसरले. खासगी बँका, एफएमसीजी समभागांसह सर्व क्षेत्रातील समभागांमध्ये विक्री झाली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांना सर्वाधिक फटका बसला. एवढेच काय लार्ज कॅप शेअर्सही या घसरणीतून सुटू शकले नाहीत.

गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी रुपयांचे नुकसान
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप शुक्रवारी म्हणजेच ३ जानेवारी रोजी ४.४९ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. आज विक्रीच्या दबावामुळे ते ४.३८ लाख कोटी रुपयांवर घसरले. अशा प्रकारे एका दिवसात गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. आज बीएसई सेन्सेक्स १२५८.१२ अंकांनी घसरला आणि ७७,९६४.९९ अंकांवर बंद झाला. त्याच वेळी NSE निफ्टी ३८८.७० अंकांच्या मोठ्या घसरणीसह २३,६१६.०५ वर बंद झाला.

भविष्यात काय होणार?
शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही त्यांच्या २०० दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेज (DMA) च्या खाली घसरले आहेत. विक्रीचे कारण परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) केलेल्या विक्रीत वाढ आणि आगामी तिसऱ्या तिमाही कमाई सत्राविषयीची चिंता असू शकते. याव्यतिरिक्त, चीनी व्हायरस HMPV विषाणूच्या भारतात प्रवेश झाल्याच्या बातम्यांनी मंदीच्या भावनांमध्ये आणखी भर घातली आहे, अलीकडील पुलबॅक रॅलीनंतर विक्रीची नवीन फेरी सुरू झाली आहे. एकूणच बाजारातील भावना कमकुवत आहे. मात्र, बुलसाठी आशेचा किरण कायम आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही सध्या अनुक्रमे २३,५०० आणि ४९,७०० या त्यांच्या महत्त्वाच्या सपोर्ट स्तरांजवळ व्यवहार करत आहेत, ज्यामुळे बुल्सला थोडा दिलासा मिळू शकतो.

सपोर्ट तुटल्यास विक्री वाढेल
बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे की निफ्टी आणि बँक निफ्टी आज समर्थनासपोर्ट वर बंद झाले. मंगळवारी हा सपोर्ट तुटल्यास बाजारात मोठी घसरण दिसून येऊ शकते. त्याच वेळी, पुलबॅक असल्यास, गती परत येऊ शकते. वाढ कायम राहील अशी आशा कमी आहे.

Web Title: sensex fell more than 1200 investors lost 11 lakh crores today bad news for the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.