Lokmat Money >शेअर बाजार > सेन्सेक्स घसरणीसह बंद, Kotak Bank घसरला; ओएनजीसी-PSU बँकांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी

सेन्सेक्स घसरणीसह बंद, Kotak Bank घसरला; ओएनजीसी-PSU बँकांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी

दिवसभराच्या चढ-उतारानंतर मंगळवारी बीएसई सेन्सेक्स ३३ अंकांनी घसरून ७६,४५७ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५ अंकांच्या किरकोळ वाढीनंतर २३,२६४ अंकांवर बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 04:06 PM2024-06-11T16:06:06+5:302024-06-11T16:06:51+5:30

दिवसभराच्या चढ-उतारानंतर मंगळवारी बीएसई सेन्सेक्स ३३ अंकांनी घसरून ७६,४५७ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५ अंकांच्या किरकोळ वाढीनंतर २३,२६४ अंकांवर बंद झाला.

Sensex closes lower Kotak Bank slips Shares of ONGC PSU Banks rally bumper know share market share details adani group shares | सेन्सेक्स घसरणीसह बंद, Kotak Bank घसरला; ओएनजीसी-PSU बँकांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी

सेन्सेक्स घसरणीसह बंद, Kotak Bank घसरला; ओएनजीसी-PSU बँकांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी

Share Market : दिवसभराच्या चढ-उतारानंतर मंगळवारी बीएसई सेन्सेक्स ३३ अंकांनी घसरून ७६,४५७ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५ अंकांच्या किरकोळ वाढीनंतर २३,२६४ अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात ओएनजीसी, लार्सन, अदानी पोर्ट्स आणि मारुती सुझुकी यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर कोटक बँक, डिव्हिस लॅब्स, एशियन पेंट्स आणि आयटीसीचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. शेअर बाजाराच्या कामकाजात निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस निर्देशांकात घसरण नोंदविण्यात आली, तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन झोनमध्ये बंद झाले.
 

शेअर बाजारात मोठे चढ-उतार
 

मंगळवारी अस्थिर व्यवहारानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. पीएसयू कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ नोंदविण्यात आली. इरकॉन इंटरनॅशनल, टॅक्स मेको रेल, आयआरसीटीसी, रेल विकास निगम, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, बीईएमएल लिमिटेड, कंटेनर कॉर्पोरेशन, राइट्स लिमिटेड, माझगाव डॉक, गेल, आयआरएफसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एचएएल, एनटीपीसी, टिटागड रेल, गार्डन रीच शिपबिल्डर आणि एनएमडीसी लिमिटेडचे शेअर्स तेजीसह बंद झाले. मंगळवारी कोचीन शिपयार्ड आणि कोल इंडिया लिमिटेडचे शेअर्स घसरले होते.
 

ओएनजीसी वधारला
 

कामकाजादरम्यान ओएनजीसीचे शेअर्स जवळपास ६ टक्क्यांनी वधारले. अशोक लेलँड, लार्सन, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक आणि विप्रो यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली, तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स आणि कोटक महिंद्रा बँक यांचे शेअर्स घसरले.
 

अदानी समूहाच्या शेअरची स्थिती ?
 

शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गौतम अदानी समूहाच्या १० पैकी दोन कंपन्यांचे शेअर्स मंगळवारी ग्रीन झोनमध्ये बंद झाले. तर आठ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचे झाले तर पिडिलाइट इंडस्ट्रीज, टायटन, फिनोलेक्स केबल, गरवारे टेक्निकल फायबर्स आणि सर्वोटेक पॉवर हे शेअर्स घसरणीसह बंद झाले, तर होम फर्स्ट फायनान्स, अशोक लेलँड, पॉलीकॅब इंडिया, महिंद्रा हॉलिडेज आणि फेडरल बँक हे शेअर्स तेजीसह बंद झाले.

Web Title: Sensex closes lower Kotak Bank slips Shares of ONGC PSU Banks rally bumper know share market share details adani group shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.