SEBI News Update: शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या नव्या आदेशामुळे नियामकाकडे नोंदणी नसलेल्या फिनइन्फ्लुएंसरच्या अडचणीत भर पडली आहे. यापुढे स्टॉक मार्केट एज्युकेशनशी निगडीत असलेल्या लोकांना यापुढे लाइव्ह म्हणजेच करंट मार्केट प्राईजचा वापर करता येणार नसल्याचं सेबीनं आपल्या आदेशात म्हटलं. लोकांना शिक्षित करण्यासाठी त्यांना तीन महिन्यांच्या किंमतीचं उदाहरण घ्यावं लागेल.
बुधवारी सेबीने (Securities and Exchange Board of India) एक परिपत्रक जारी केलं. सेबीने या परिपत्रकात एफएक्यू जारी केलं आहे. शिक्षण आणि सल्ल्याशी निगडीत फरकावर सेबीनं म्हटलं की, जी व्यक्ती केवळ शिक्षणाशी जोडलेली आहे, त्यांना निर्बंध असलेल्या बाबींमध्ये सामील होता येणार नसल्याचं, त्यांनी म्हटलं. अशा व्यक्तीने गेल्या तीन महिन्यांच्या बाजारभावाच्या आकडेवारीचा वापर सिक्युरिटीजसह कोणत्याही शेअर्सवर बोलण्यासाठी किंवा वाटाघाटी करण्यासाठी किंवा प्रदर्शित करण्यासाठी करू नये म्हणजेच शेअर्सचे कोणतेही कोड नेम वापरून त्यांच्या भाषण, व्हिडिओ, टिकर, स्क्रीनशेअर दरम्यान शेअर्सच्या भविष्यातील किंमतींचा सल्ला किंवा शिफारस करू नये, असंही त्यांनी नमूद केलंय.
किंबहुना असे अनेक फिनफॉलर्स आहेत जे नोंदणीकृत नाहीत आणि शेअर बाजार शिक्षणाच्या नावाखाली शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत असतात. सेबीच्या या कारवाईमुळे शेअर बाजार शिक्षणाच्या नावाखाली शेअर्स खरेदी-विक्रीच्या सल्ल्याला आळा बसेल. सेबीच्या या निर्णयानंतर फिनफ्ल्युएन्सर्सच्या सबस्क्रायबर्समध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. 'इनव्हेस्टर्स एज्युकेशनवर निर्बंध नाहीत. परंतु हे त्यांनीच करावं ज्यांना रेग्युलेटर रेग्युलेट करतं,' असं सेबीनं म्हटलंय.
...त्यानाही परवानगी नाही
सेबीने आपल्या परिपत्रकात म्हटलंय की, नोंदणीकृत मध्यस्थांना अनधिकृत सल्ला देणाऱ्या किंवा रिजेक्ट रिटर्न क्लेम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी ग्राहकांची माहिती व्यवहार करण्याची किंवा ती देण्याची परवानगी नाही. सेबीनं एफएक्यूमध्ये हे स्पष्टीकरण दिलंय. ग्राहकांची माहिती देणं हे 'ग्राहकाचे नाव सुचविणं' या आहे. त्यामुळे अशा कोणत्याही व्यक्तीसोबत किंवा त्यांच्याकडून ग्राहकांचा कोणताही देवाण-घेवाणीचा व्यवहार किंवा माहिती देणं हे या नियमांनुसार एक प्रकारचे सहकार्य ठरेल आणि त्याला परवानगी नाही,' असंही त्यांनी म्हटलंय.