Lokmat Money >शेअर बाजार > तिसऱ्यांदा बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी, २ वर एक शेअर मिळणार; भाव ₹३० पेक्षाही कमी, तुमच्याकडे आहे का?

तिसऱ्यांदा बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी, २ वर एक शेअर मिळणार; भाव ₹३० पेक्षाही कमी, तुमच्याकडे आहे का?

Bonus Share: ३० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या शेअर्सनं बोनस स्टॉक देण्याची घोषणा केलीये. ही कंपनी तिसऱ्यांदा बोनस शेअर्स देणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 14:25 IST2025-01-27T14:24:15+5:302025-01-27T14:25:47+5:30

Bonus Share: ३० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या शेअर्सनं बोनस स्टॉक देण्याची घोषणा केलीये. ही कंपनी तिसऱ्यांदा बोनस शेअर्स देणार आहे.

sbc exports will give one bonus share for every 2 shares price less than rs 30 Do you have any | तिसऱ्यांदा बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी, २ वर एक शेअर मिळणार; भाव ₹३० पेक्षाही कमी, तुमच्याकडे आहे का?

तिसऱ्यांदा बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी, २ वर एक शेअर मिळणार; भाव ₹३० पेक्षाही कमी, तुमच्याकडे आहे का?

Bonus Share: ३० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या शेअर्सनं बोनस स्टॉक देण्याची घोषणा केलीये. एसबीसी एक्सपोर्ट्स आपल्या गुंतवणूकदारांना बोनस देणार आहे. कंपनीच्या वतीनं २ शेअरवर १ शेअर बोनस दिला जाईल. कंपनी तिसऱ्यांदा बोनस शेअर्स देणार आहे.

बीएसईला दिलेल्या माहितीनुसार, एसबीसी एक्सपोर्ट्सनं सांगितलंय की, १ रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या २ शेअर्सवर १ शेअर बोनस दिला जाईल. कंपनीनं अद्याप याची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. कंपनी ही बोनस शेअर देण्याची प्रक्रिया २ महिन्यांत पूर्ण करेल. अशा तऱ्हेनं येत्या काळात कंपनी रेकॉर्ड डेट जाहीर करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तिमाही निकालांमुळे उत्साहित

डिसेंबर तिमाहीत एसबीसी एक्सपोर्टची निव्वळ विक्री ५०.०२ कोटी रुपये होती. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ विक्रीत ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री ४७.८१ कोटी रुपये होती. कंपनीचा निव्वळ नफा ३.२७ कोटी रुपये होता. कंपनीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत १५.३९ टक्क्यांनी वाढलाय.

२ वेळा बोनस शेअर दिले

२०२२ मध्ये पहिल्यांदाच कंपनीनं १ शेअरवर १ शेअर बोनस दिला होता. या तारखेला कंपनीचे शेअर्स १० भागांमध्ये विभागले गेले होते. ज्यामुळे कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू प्रति शेअर १ रुपयापर्यंत खाली आली. २०२४ मध्येही कंपनीनं बोनस शेअर्स दिले होते. त्यानंतर कंपनीने २ शेअरवर १ शेअर बोनस दिला.

आज ४ टक्क्यांची घसरण

बीएसईवर कंपनीचा शेअर २३.२४ रुपयांवर खुला झाला. कंपनीच्या शेअरची किंमत ४ टक्क्यांहून अधिक घसरून २३.५१ रुपयांवर आली. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरची किमती तब्बल २२ टक्क्यांनी घसरली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: sbc exports will give one bonus share for every 2 shares price less than rs 30 Do you have any

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.