Lokmat Money >शेअर बाजार > Sat Kartar Shopping shares: १००% पेक्षा अधिक रिटर्न; 'या' IPO नं केली कमाल, आज पुन्हा अपर सर्किट

Sat Kartar Shopping shares: १००% पेक्षा अधिक रिटर्न; 'या' IPO नं केली कमाल, आज पुन्हा अपर सर्किट

Sat Kartar Shopping shares: कंपनीचे शेअर्स सकाळच्या सत्रातच अपर सर्किटवर पोहोचले. एनएसईवर ५ टक्क्यांच्या वाढीनंतर कंपनीच्या शेअर्सचा भाव १७८ रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:06 IST2025-01-21T13:06:02+5:302025-01-21T13:06:02+5:30

Sat Kartar Shopping shares: कंपनीचे शेअर्स सकाळच्या सत्रातच अपर सर्किटवर पोहोचले. एनएसईवर ५ टक्क्यांच्या वाढीनंतर कंपनीच्या शेअर्सचा भाव १७८ रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

Sat Kartar Shopping shares More than 100 percent return IPO hits peak upper circuit again today | Sat Kartar Shopping shares: १००% पेक्षा अधिक रिटर्न; 'या' IPO नं केली कमाल, आज पुन्हा अपर सर्किट

Sat Kartar Shopping shares: १००% पेक्षा अधिक रिटर्न; 'या' IPO नं केली कमाल, आज पुन्हा अपर सर्किट

Sat Kartar Shopping shares: सत करतार शॉपिंगच्या शेअरमध्ये मंगळवारी जोरदार तेजी दिसून आली. कंपनीचे शेअर्स सकाळच्या सत्रातच अपर सर्किटवर पोहोचले. एनएसईवर ५ टक्क्यांच्या वाढीनंतर कंपनीच्या शेअर्सचा भाव १७८ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. कंपनीची लिस्टिंग शुक्रवारी करण्यात आली. कंपनी ९० टक्क्यांहून अधिक प्रीमियमसह १५३.९० रुपयांवर शेअर बाजारात लिस्ट झाली.

लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये गुंतवणूक आहे आणि त्यांनी शेअर्स ठेवले आहेत, त्यांचे पैसे दुप्पट झाले आहेत. सत करतार शॉपिंग आयपीओचा प्राइस बँड ७७ ते ८१ रुपये प्रति होती.

हा आयपीओ १० जानेवारी रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला झाला. कंपनीचा आयपीओ १४ जानेवारीपर्यंत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होता. या एसएमई आयपीओसाठी लॉट साइज १६०० शेअर्स होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १ लाख २९ हजार ६०० रुपयांची गुंतवणूक करावी लागली होती.

३०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्श

हा आयपीओ ३०० पेक्षा अधिक पट सब्सक्राइब झाला होता. ३ दिवसांच्या ओपनिंगदरम्यान आयपीओ एकूण ३३२.७८ पट सब्सक्राइब झाला होता. तर रिटेल कॅटेगरीला २५० पट, क्यूआयबीला १२४.७५ पट, तर एनआयआय कॅटेगरीला ८०० पेक्षा जास्त सब्सक्राइब मिळाले. कंपनीच्या आयपीओची साईज ३३.८० कोटी रुपये होता. कंपनीचा आयपीओ पूर्णपणे फ्रेश शेअर्सवर आधारित होता. कंपनीचा आयपीओ ९ जानेवारी रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला होता. कंपनीनं अँकर इन्व्हेस्टर्सच्या माध्यमातून ९.५५ कोटी रुपये उभे केले होते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Sat Kartar Shopping shares More than 100 percent return IPO hits peak upper circuit again today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.