RRP Semiconductor Multibagger Return : तुम्ही शेअर बाजारातगुंतवणूक करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. गेल्या एका वर्षापासून बाजारात घसरण होत असताना, काही शेअर्स असेही आहेत, ज्यांनी घसरत्या बाजारातही दमदार परतावा दिला आहे.
बाजारातील घसरणीचा काही शेअर्सवर कोणताही परिणाम झाला नाही, शिवाय काळानुसार ते वाढतच राहिले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत, जो वर्षापूर्वी पेनी स्टॉकमध्ये गणला जायचा. पण आता एका वर्षात त्याने मल्टीबॅगर रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
आम्ही ज्या स्टॉकबद्दल बोलत आहोत, तो RRP सेमीकंडक्टर नावाचा स्टॉक आहे. एखाद्या व्यक्तीने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याची रक्कम आज 39 लाख रुपये झाली असती. या शेअरला गेल्या वर्षभरात सतत अप्पर सर्किट लागत आहे. या वर्षातही आतापर्यंत या शेअरने गुंतवणूकदारांना 305 टक्के परतावा दिला आहे. तर, एका वर्षात 3835 टक्के नफा दिला आहे.
किंमत 17 वरुन 752 रुपये झाली
आरआरपी सेमीकंडक्टरच्या शेअरची किंमत गेल्या वर्षी फक्त 17.35 रुपये होती, जी आता 752.55 रुपये झाली आहे. या स्टॉकने एका वर्षात 3835 टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही एक वर्षापूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची किंमत 39 लाख रुपये झाली असती. एखाद्याने फक्त 25 हजार रुपये गुंतवले असते, तरीदेखील त्याला तब्बल 11 लाख रुपये मिळाले असते.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांची मदत घ्या.)