Lokmat Money >शेअर बाजार > २००% पेक्षा जास्त रिटर्न देणारा स्टॉक पुन्हा चर्चेत! महाराष्ट्र सरकारची मोठी ऑर्डर, पुढे आणखी झेप घेणार?

२००% पेक्षा जास्त रिटर्न देणारा स्टॉक पुन्हा चर्चेत! महाराष्ट्र सरकारची मोठी ऑर्डर, पुढे आणखी झेप घेणार?

RPP Infra Projects Ltd : कंपनीने म्हटले आहे की त्यांना महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून १३४ कोटी रुपयांचा मोठी ऑर्डर मिळाला आहे. गेल्या ५ दिवसांत या स्टॉकमध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 10:22 IST2025-09-05T10:21:33+5:302025-09-05T10:22:39+5:30

RPP Infra Projects Ltd : कंपनीने म्हटले आहे की त्यांना महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून १३४ कोटी रुपयांचा मोठी ऑर्डर मिळाला आहे. गेल्या ५ दिवसांत या स्टॉकमध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

RPP Infra Projects Bags New ₹134 Crore Order from Maharashtra Govt | २००% पेक्षा जास्त रिटर्न देणारा स्टॉक पुन्हा चर्चेत! महाराष्ट्र सरकारची मोठी ऑर्डर, पुढे आणखी झेप घेणार?

२००% पेक्षा जास्त रिटर्न देणारा स्टॉक पुन्हा चर्चेत! महाराष्ट्र सरकारची मोठी ऑर्डर, पुढे आणखी झेप घेणार?

RPP Infra Projects Ltd : शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांची नजर आता स्मॉलकॅप कंपनी आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या स्टॉकवर असणार आहे. कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून एक मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे गुरुवारी या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून आली. ५ टक्क्यांहून अधिक वाढीसह हा शेअर १४८ रुपयांवर बंद झाला. गेल्या ५ दिवसांतच या स्टॉकने १७ टक्क्यांहून अधिकचा रिटर्न दिला आहे.

महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी १३४ कोटींचे कंत्राट
कंपनीला महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSIDC) कडून रायगड जिल्ह्यातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी एक नवीन कंत्राट मिळाले आहे. या कंत्राटाची किंमत १३४.२१ कोटी रुपये आहे. आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड कर्जत तालुक्यातील दोन रस्त्यांचे (माथेरान-नेरळ-काळंब रोड आणि लोभ्यांचीवाडी-सुगवे-पिंपलोळी-नेरळ रोड) नूतनीकरण करणार आहे. या रस्त्यांची एकूण लांबी सुमारे ३१ किलोमीटर असून, हे काम १२ महिन्यांच्या आत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

आधी मिळाला होता BHEL कडून मेगा-ऑर्डर
अलीकडेच, या कंपनीला भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) कडून १,१२५.९४ कोटी रुपयांचे एक मोठे कंत्राट मिळाले होते. देशभरातील विविध प्रोजेक्ट्ससाठी फॅक्टरी-निर्मित पायाभूत सुविधा तयार करणे आणि त्यांचा पुरवठा करणे हे या कंत्राटाचे स्वरूप आहे. हा मेगा-प्रकल्प ६० महिन्यांमध्ये (५ वर्षांत) पूर्ण केला जाईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा करार त्यांच्या विकासातील एक महत्त्वाचे पाऊल असून, यामुळे इतर सरकारी आणि खाजगी कंपन्यांकडूनही काम मिळण्याची शक्यता वाढली आहे.

वाचा - GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या

शेअरची कामगिरी आणि भविष्यातील शक्यता
आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट्सच्या शेअरने गेल्या ५ वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना २५६ टक्के चा मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. मात्र, गेल्या एका वर्षात हा स्टॉक ३५ टक्क्यांनी घसरला आहे. स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २५५.३० रुपये असून, नीचांक १०.५८ रुपये आहे. कंपनीला मिळत असलेले मोठे सरकारी कंत्राट पाहता, भविष्यात कंपनीची कामगिरी सुधारण्याची शक्यता आहे.    
 

Web Title: RPP Infra Projects Bags New ₹134 Crore Order from Maharashtra Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.