Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > लक्ष्मी पावली! दिवाळीनिमित्त रिलायन्सची ₹56,000 कोटींची कमाई; शेअर ₹1,760 पार जाणार...

लक्ष्मी पावली! दिवाळीनिमित्त रिलायन्सची ₹56,000 कोटींची कमाई; शेअर ₹1,760 पार जाणार...

दिवाळीनिमित्त रिलायन्सच्या शेअरमध्ये जोरदार वाढ दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:10 IST2025-10-20T13:09:45+5:302025-10-20T13:10:38+5:30

दिवाळीनिमित्त रिलायन्सच्या शेअरमध्ये जोरदार वाढ दिसून आली.

Reliance's Diwali revenue of ₹56,000 crore; Shares will cross ₹1,760 | लक्ष्मी पावली! दिवाळीनिमित्त रिलायन्सची ₹56,000 कोटींची कमाई; शेअर ₹1,760 पार जाणार...

लक्ष्मी पावली! दिवाळीनिमित्त रिलायन्सची ₹56,000 कोटींची कमाई; शेअर ₹1,760 पार जाणार...

Share Market : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या शेअरने जोरदार उसळी घेतली. कंपनीचा शेअर सोमवारी 3% पेक्षा जास्त वाढला, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ₹56,000 कोटींची वाढ झाली.

ऑइलपासून ते टेलिकॉम क्षेत्रापर्यंत विस्तारलेल्या रिलायन्सने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर जबरदस्त तेजी दाखवली. एनएसईवर RIL चा शेअर ₹1,460.60 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप ₹19.17 लाख कोटींवरुन ₹19.73 लाख कोटींवर गेले, म्हणजेच सुमारे ₹55,551 कोटींची वाढ झाली.

एमके ग्लोबलचे विश्लेषण

ब्रोकरेज फर्म एमके ग्लोबल च्या मते, RIL ने FY26 च्या दुसऱ्या तिमाहीत 4% एकत्रित EBITDA वाढ नोंदवली आहे. रिटेल आणि इतर व्यवसायांमधील कमाई अपेक्षेपेक्षा चांगली राहिली. PAT (Profit After Tax) अनुकूल राहिला. जियो 5G कॅपेक्समुळे काही वाढीव खर्च झाला. तर, रिटेल रेव्हेन्यू आणि EBITDA अंदाजापेक्षा अधिक राहिले. 

रिलायन्स इंटेलिजन्स आणि AI गुंतवणूक

कंपनीने नुकतंच “रिलायन्स इंटेलिजन्स” लॉन्च केले असून, हे AI क्षेत्रातील एक महत्त्वाकांक्षी पाऊल मानले जात आहे. जामनगर येथे गीगावॉट डेटा सेंटर्स मध्ये गुंतवणूक आणि कन्झ्युमर व एंटरप्राइज AI सोल्युशन्स साठी अनेक करार करण्यात आले आहेत.

न्यू एनर्जी आणि ग्रीन मिशन

नवीन उर्जेच्या क्षेत्रात, सेल उत्पादन लाइन या महिन्यात सुरू होणार आहे. तसेच मॉड्यूल, बॅटरी आणि उत्पादनासह RTC RE इकोसिस्टम FY27 च्या पहिल्या सहामाहीत चालू होईल. एमके ग्लोबलने RIL वर ‘खरेदी’ (Buy) सल्ला कायम ठेवत लक्ष्य किंमत ₹1,680 वरून ₹1,760 पर्यंत वाढवली आहे.

नुवामाचा बुलिश दृष्टिकोन

ब्रोकरेज फर्म नुवामाने RIL साठी तीन प्रमुख वाढीचे घटक सांगितले असून, शेअरचा टार्गेट प्राइस ₹1,769 ठरवला आहे:

नवीन ऊर्जा (NE) इकोसिस्टम – 10GW मॉड्यूल/सेल उत्पादन FY27 मध्ये एकत्रित PAT मध्ये 6% योगदान देईल.

AI सेंटर्स – सर्व डेटा सेंटर गुंतवणुकी RIL मार्फतच केल्या जातील.

मेटासोबत भागीदारी – AI सोल्युशन्स डेव्हलप करण्यासाठी नवीन संयुक्त व्यवसाय सुरू होईल.

याशिवाय, FMCG ब्रँड्सची वाढ, फूड पार्क्सवर फोकस आणि PVC उत्पादनवाढ 2026 च्या अखेरीस पूर्ण करण्याचा उद्देश आहे.

शेअरबाजारातही सकारात्मक वातावरण

रिलायन्सच्या वाढीमुळे संपूर्ण शेअरबाजारात उत्साह दिसून आला. BSE Sensex 438 अंकांनी वाढून 84,390.39 वर पोहोचला, आणि सत्रादरम्यान 84,656.56 पर्यंत गेला. NSE Nifty 135 अंकांनी वाढून 25,842.35 वर पोहोचला.

(टीप-कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.)

Web Title : रिलायंस का दिवाली धमाका: ₹56,000 करोड़ की कमाई, शेयर मूल्य में उछाल!

Web Summary : दिवाली के बाद रिलायंस के शेयरों में उछाल, निवेशकों की संपत्ति में ₹56,000 करोड़ की वृद्धि। मजबूत Q2 परिणाम, AI निवेश और एमके ग्लोबल और नुवामा जैसे ब्रोकरेज की तेजी के दृष्टिकोण, ₹1,760 के शेयर मूल्य लक्ष्य के साथ, रैली को बढ़ावा दिया, जिससे व्यापक बाजार पर सकारात्मक प्रभाव पड़ा।

Web Title : Reliance Diwali Bonanza: ₹56,000 Crore Earnings, Share Price Soaring!

Web Summary : Reliance's share surged post-Diwali, boosting investor wealth by ₹56,000 crore. Strong Q2 results, AI investments, and a bullish outlook from brokerages like MK Global and Nuwama, projecting a share price target of ₹1,760, fueled the rally, impacting the broader market positively.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.