Lokmat Money >शेअर बाजार > अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी

अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी

Reliance Power Stock Price: अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुप कंपनीच्या बाजारमूल्यात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली, या काळात त्यात १७ टक्क्यांनी वाढ झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:20 IST2025-06-10T16:20:14+5:302025-06-10T16:20:14+5:30

Reliance Power Stock Price: अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुप कंपनीच्या बाजारमूल्यात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली, या काळात त्यात १७ टक्क्यांनी वाढ झाली.

reliance power stock price anil ambani company broke the record set 10 years ago earned thousands of crores in a single month | अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी

अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी

Reliance Power Stock Price: रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये मंगळवारीही तेजी कायम होती. इंट्रा डे मध्ये कंपनीचा शेअर ११ टक्क्यांनी वधारुन १० वर्षांच्या उच्चांकी ७१.३५ रुपयांवर पोहोचला. वीज निर्मिती कंपनीचा शेअर नोव्हेंबर २०१४ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर व्यवहार करत आहे. अनिल अंबानींच्यारिलायन्स ग्रुप कंपनीच्या बाजारमूल्यात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली, या काळात त्यात १७ टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या महिन्यात, बीएसईवर या शेअरमध्ये ८५ टक्क्यांची वाढ झाली. दुपारच्या सुमारास रिलायन्स पॉवरचा शेअर ८.६८ टक्क्यांनी वाढून ७०.१५ रुपयांवर व्यवहार करत होता, तर बीएसई सेन्सेक्स स्थिर होता. तर कामकाजाच्या अखेरिस कंपनीच्या शेअरमध्ये १०.२५ टक्क्यांची वाढ होऊन तो ७१.१७ रुपयांवर बंद झाला.

किरकोळ गुंतवणुकदारांकडे ५० टक्के हिस्सा

एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, ७ मे २०२५ पर्यंत रिलायन्स पॉवरमध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा सुमारे ५० टक्के हिस्सा आहे. दोन लाख रुपयांपर्यंत नाममात्र भागभांडवल असलेल्या रेजिडेंट्स इंडिविजुअल्स (२७.०२ टक्के) आणि नाममात्र भागभांडवल २ लाख रुपयांपेक्षा अधिक (२१.५९ टक्के) असलेल्या रेजिडेंट्स इंडीविजुअल्सकडे मिळून ४८.६१ टक्के हिस्सा आहे. रिलायन्स पॉवरमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) २.४९ टक्के, तर व्हीएफएसआय होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडचा ४.९९ टक्के हिस्सा आहे. रिलायन्स पॉवरचे प्रवर्तक रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे २४.९० टक्के हिस्सा आहे.

तेजीची कारणं काय?

९ मे २०२५ रोजी रिलायन्स पॉवरला मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत १२६ कोटी रुपयांचा नफा झाला होता, तर गेल्या वर्षी याच कालावधीत ३९७.५६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या २,१९४ कोटी रुपयांवरून घटून २,०६६ कोटी रुपयांवर आलं आहे. रिलायन्स पॉवरचे डेट-टू-इक्विटी रेशो उद्योगातील सर्वात कमी आहे, जे आर्थिक वर्ष २०२० मधील १.६१:१ वरून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ०.८८:१ पर्यंत घसरलंय.

याव्यतिरिक्त, रिलायन्स पॉवरचं युनिट रिलायन्स एनयू सनटेकनं आशियातील सर्वात मोठा इंटिग्रेटेड सौर आणि बॅटरी ऊर्जा साठवण प्रकल्प विकसित करण्यासाठी एसईसीआयबरोबर २५ वर्षांचा वीज खरेदी करार केला आहे. १०,००० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात ९३० मेगावॅट (मेगावॅट) सौर क्षमता आणि ४६५ मेगावॅट / १८६० मेगावॉट स्टोरेजचा समावेश असेल, जे ३.५३ रुपये प्रति किलोवॅट या निश्चित दरानं कार्य करेल.

२८ मे २०२५ रोजी, रिलायन्स एनयू एनर्जीज प्रायव्हेटला (रिलायन्स एनयू एनर्जीज) ३५० मेगावॅट आंतरराज्य पारेषण प्रणाली (आयएसटीएस) आणि १७५ मेगावॉट / ७०० मेगावॉट बॅटरी ऊर्जा स्टोरेज सिस्टमशी (बीईएसएस) जोडलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी एसजेव्हीएनकडून लेटर ऑफ अॅवॉर्ड (एलओए) प्राप्त झालं.

३१ डिसेंबर २०२४ रोजी रिलायन्स पॉवरची उपकंपनी असलेल्या सासन पॉवरनं ब्रिटनच्या आयआयएफसीएलला १५० मिलियन डॉलर्सची रक्कम भरली. या पेमेंटमुळे लोन कव्हरेज मजबूत होईल, लिक्विडिटी वाढेल आणि क्रेडिट रेटिंग सुधारेल, असं कंपनीनं म्हटलं.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: reliance power stock price anil ambani company broke the record set 10 years ago earned thousands of crores in a single month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.