Lokmat Money >शेअर बाजार > रिलायन्सच्या 36 लाख गुंतवणूकदारांना जॅकपॉट, दोन दिवसांत 71 हजार कोटींचा नफा

रिलायन्सच्या 36 लाख गुंतवणूकदारांना जॅकपॉट, दोन दिवसांत 71 हजार कोटींचा नफा

Reliance News : रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स पुन्हा वधारले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 19:01 IST2025-01-08T19:00:28+5:302025-01-08T19:01:03+5:30

Reliance News : रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स पुन्हा वधारले आहेत.

Reliance News: 36 lakh Reliance investors hit jackpot, profit of Rs 71 thousand crores in two days | रिलायन्सच्या 36 लाख गुंतवणूकदारांना जॅकपॉट, दोन दिवसांत 71 हजार कोटींचा नफा

रिलायन्सच्या 36 लाख गुंतवणूकदारांना जॅकपॉट, दोन दिवसांत 71 हजार कोटींचा नफा

Reliance News : मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील देशातील सर्वात मोठ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स पुन्हा वधारले आहेत. गेल्या दोन दिवसांत कंपनीच्या शेअर्सनी 4 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. यामुळे कंपनीच्या 36 लाख भागधारकांना मोठा नफा झाला आहे. दोन दिवसांत कंपनीच्या मार्केट कॅपमध्येही 71 हजार कोटींची वाढ झाली आहे. यासह कंपनीचे मार्केट कॅप पुन्हा एकदा 17 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. शेअर्समधील वाढीमुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांनाही मोठा नफा झाला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी वाढ
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली. दिवसभरात सेन्सेक्स आणि निफ्टी पूर्ण दबावाखाली असतान रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर 1.70 टक्क्यांच्या वाढीसह 1,262 रुपयांवर बंद झाले. ट्रेडिंग सत्रादरम्यान हा शेअर दिवसाच्या उच्चांकावर रु. 1,270.70 पोहोचला होता. एका दिवसापूर्वी हा शेअर 1,240.90 रुपयांवर बंद झाला होता.

दोन दिवसांत 4 टक्क्यांहून अधिक वाढ
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये दोन दिवसांत 3.59 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बुधवारच्या उच्चांकावरून मोजले तर दोन दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 4.30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 1,218.20 रुपयांवर बंद झाला, तर बुधवारी 1,270.70 रुपयांवर पोहोचला. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 52.5 रुपयांची वाढ झाली आहे. तज्ञांच्या मते, कंपनीचे शेअर्स येत्या काही दिवसांत आणखी वाढतील.

दोन दिवसांत 71 हजार कोटींचा नफा
गेल्या दोन दिवसांत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, सोमवारी कंपनीचे मार्केट कॅप 16,48,448.55 कोटी रुपये होते. जे दोन दिवसांत 17,19,490.70 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ दोन दिवसांत मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये 71,042.15 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Reliance News: 36 lakh Reliance investors hit jackpot, profit of Rs 71 thousand crores in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.