Lokmat Money >शेअर बाजार > मुकेश अंबानींवर Jio ने पाडला पैशांचा पाऊश, तिसऱ्या तिमाहीत ₹18,540 कोटींचा नफा...

मुकेश अंबानींवर Jio ने पाडला पैशांचा पाऊश, तिसऱ्या तिमाहीत ₹18,540 कोटींचा नफा...

Reliance Industries Q3 Results: आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 18,540 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 21:25 IST2025-01-16T21:24:33+5:302025-01-16T21:25:58+5:30

Reliance Industries Q3 Results: आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 18,540 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

Reliance Industries Q3 Results: profit of ₹ 18,540 crore in the third quarter | मुकेश अंबानींवर Jio ने पाडला पैशांचा पाऊश, तिसऱ्या तिमाहीत ₹18,540 कोटींचा नफा...

मुकेश अंबानींवर Jio ने पाडला पैशांचा पाऊश, तिसऱ्या तिमाहीत ₹18,540 कोटींचा नफा...

Reliance Industries Q3 Results : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. अंबानींच्या या कंपनीच्या निव्वळ नफ्यात आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. समूहाचे डिजिटल युनिट, म्हणजेच Jio Infocomm ने ऑक्टोबर 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान कंपनीची कमाई आणि नफा वाढवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. जिओ इन्फोकॉमचा नफा 24 टक्क्यांनी वाढला आहे.

देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचा निव्वळ नफा 7.4 टक्क्यांनी वाढून 18,540 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या किरकोळ व्यवसायातील तेजी आणि दूरसंचार क्षेत्रातील कमाईत वाढ झाल्यामुळे एकूण नफा वाढला आहे.

18 हजार कोटींहून अधिक नफा
गुरुवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत रिलायन्सने सांगितले की, चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत त्यांचा एकूण निव्वळ नफा 18,540 कोटी रुपये झाला आहे. यापूर्वी आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने रु. 17,265 कोटी नफा कमावला होता. तर, चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 16,563 कोटी रुपये होता. 

रिलायन्स रिटेलच्या कमाईत 10 टक्क्यांनी वाढ 
आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने 3,458 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 3,145 कोटी रुपयांचा नफा झाला होता. अशा परिस्थितीत, रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचा YOY (वर्षानुवर्षे) नफा 10 टक्क्यांनी वाढला आहे.

जिओच्या नफ्यात वाढ
चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या निव्वळ नफ्यात 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फी वाढीमुळे कंपनीची प्रति ग्राहक सरासरी कमाई (ARPU) वाढली आहे. गुरुवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की, स्टँडअलोन आधारावर निव्वळ नफा डिसेंबरच्या तिमाहीत 6,477 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 5,208 कोटी रुपये होता. 

Web Title: Reliance Industries Q3 Results: profit of ₹ 18,540 crore in the third quarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.