Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?

रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?

NCC Ltd Stock : प्रसिद्ध गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे शेअर रॉकेट होण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:58 IST2025-11-02T14:57:29+5:302025-11-02T14:58:20+5:30

NCC Ltd Stock : प्रसिद्ध गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे शेअर रॉकेट होण्याची शक्यता आहे.

Rekha Jhunjhunwala Portfolio Stock NCC Ltd Wins ₹710 Cr Projects; What to Expect Monday | रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?

रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?

NCC Ltd Stock : कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील प्रमुख कंपनी एनसीसी लिमिटेडच्या स्टॉकवर सोमवारी गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असेल. याचे प्रमुख कारण म्हणजे कंपनीला नुकतीच ७१० कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. यासोबतच, ६ नोव्हेंबर रोजी कंपनी आपले तिमाही निकाल घोषित करणार असल्याने, आगामी आठवडा कंपनीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

७१० कोटी रुपयांच्या चार नवीन ऑर्डर
एनसीसी कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली की, त्यांना ऑक्टोबर २०२५ मध्ये एकूण ७१० कोटी रुपये (वजा जीएसटी) किमतीच्या चार अतिरिक्त ऑर्डर मिळाल्या आहेत. यातील ५९०.९ कोटी रुपयांचे प्रोजेक्ट कंपनीच्या बिल्डिंग डिव्हिजनशी संबंधित आहेत. उर्वरित ११९.१ कोटी रुपयांचे प्रोजेक्ट ट्रान्सपोर्टेशन डिव्हिजनशी संबंधित आहेत.

कंपनीने ३१ ऑक्टोबरच्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये ग्राहकांचे नाव किंवा ऑर्डर पूर्ण करण्याची कालमर्यादा जाहीर केली नाही. मात्र, ऑर्डर जारी करणाऱ्या कंपन्यांशी प्रवर्तक किंवा प्रवर्तक गटाचा कोणताही संबंध किंवा आर्थिक हितसंबंध नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

मागील आठवड्यातही मोठी ऑर्डर
यापूर्वी, गेल्या आठवड्यात कंपनीला सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेडकडून एक मोठी ऑर्डर मिळाली होता. ही ऑर्डर झारखंडमधील चंद्रगुप्त परिसरातील आम्रपाली ओपनकास्ट प्रकल्पातून कोळसा आणि अतिरिक्त माती काढणे व वाहतूक करण्यासंबंधीची आहे. या प्रकल्पाचे संचालन NCC करणार असून, तो पूर्ण होण्यास एकूण २,९१५ दिवस लागतील. यात ३६० दिवसांचा विकास टप्पा आणि त्यानंतर सात वर्षांचा उत्पादन कालावधी समाविष्ट आहे.

रेखा झुनझुनवाला यांची मोठी गुंतवणूक
भारतातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांचीही एनसीसी लिमिटेडमध्ये मोठी हिस्सेदारी आहे. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२५ पर्यंत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे ६६,७३३,२६६ शेअर्स होते, जी कंपनीच्या एकूण १०.६३ टक्के हिस्सेदारी दर्शवते. त्यामुळे या स्टॉकमधील कोणत्याही हालचालींवर मोठ्या गुंतवणूकदारांचे लक्ष असते.

शेअरची कामगिरी
NCC चा स्टॉक ऑक्टोबर २००३ मध्ये सुमारे ५ रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. सध्या या स्टॉकचा बाजारभाव सुमारे २१३ रुपये आहे. या कालावधीत स्टॉकने गुंतवणूकदारांना ३८०७ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या ५ वर्षांत स्टॉकने गुंतवणूकदारांना ५१२ टक्के इतका मजबूत परतावा दिला आहे. स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३२६ रुपये आहे, तर ५२ आठवड्यांचा नीचांक १७० रुपये आहे.

वाचा - तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : एनसीसी लिमिटेड को बड़ा ऑर्डर मिला; झुनझुनवाला की हिस्सेदारी से शेयर में उछाल?

Web Summary : एनसीसी लिमिटेड को ₹710 करोड़ का ऑर्डर मिला, जिससे निवेशकों की दिलचस्पी बढ़ी। तिमाही नतीजे 6 नवंबर को आने वाले हैं। रेखा झुनझुनवाला की 10.63% हिस्सेदारी है। स्टॉक मजबूत रिटर्न दिखा रहा है।

Web Title : NCC Ltd Secures Large Order; Jhunjhunwala Stake Fuels Share Surge?

Web Summary : NCC Ltd gains ₹710 crore order, boosting investor interest. Quarterly results are due November 6. Rekha Jhunjhunwala holds 10.63% stake. Stock shows strong returns.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.