Lokmat Money >शेअर बाजार > ₹४०००००० ची मिळाली ऑर्डर; पश्चिम बंगाल सरकारनं मोठं दिलं काम, ₹२९ चा आहे शेअर

₹४०००००० ची मिळाली ऑर्डर; पश्चिम बंगाल सरकारनं मोठं दिलं काम, ₹२९ चा आहे शेअर

पश्चिम बंगाल सरकारकडून कंपनीला अंदाजे 40,00,000 रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. हे काम 45 दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 13:34 IST2024-01-25T13:34:34+5:302024-01-25T13:34:53+5:30

पश्चिम बंगाल सरकारकडून कंपनीला अंदाजे 40,00,000 रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. हे काम 45 दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Received order of rs 4000000 Mehai Technology Ltd West Bengal government given big work the share is rs 29 | ₹४०००००० ची मिळाली ऑर्डर; पश्चिम बंगाल सरकारनं मोठं दिलं काम, ₹२९ चा आहे शेअर

₹४०००००० ची मिळाली ऑर्डर; पश्चिम बंगाल सरकारनं मोठं दिलं काम, ₹२९ चा आहे शेअर

Mehai Technology Ltd: मेहाई टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या ​​शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी दिसून येतेय. कंपनीचा शेअर गुरुवारी कामकाजादरम्यान 30.50 रुपयांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर त्यात घसरणही दिसून आली. यापूर्वी ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअरमध्ये चांगली वाढ दिसून आली होती. कंपनीला मिळालेल्या मोठ्या ऑर्डरमुळे शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. दरम्यान, मेहाई टेक्नॉलॉजी लिमिटेडला पश्चिम बंगाल सरकारच्या आरोग्य अभियांत्रिकी संचालनालयाच्या अलीपूर विभागाकडून नवीन ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरची किंमत अंदाजे 40,00,000 रुपये आहे. हे काम 45 दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

काय आहेत डिटेल्स?

यापूर्वी, पश्चिम बंगालच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी संचालनालयानं चार मोठे प्रकल्प सुरू केले. तात्काळ पोहोच आणि सुरक्षिततेसाठी रघुदेवपूर आणि तेंतुलबेरिया येथे ट्यूबवेल बदलण्याच्या योजना, वाढीव क्षमतेसाठी टेंटुलबेरिया येथे एक नवीन ट्यूबवेल आणि गोपालनगर उत्तरमध्ये जेजेएम अंमलबजावणी यांचा समावेश आहे. कार्यक्षम ड्रिलिंग पद्धती आणि प्रगत साहित्य वापरून ते 30 दिवसांत पूर्ण होणं अपेक्षित आहे. या प्रकल्पांमध्ये अंदाजे 79.70 लाख रुपये खर्चून पाण्याची पायाभूत सुविधा सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.
 
कंपनीचे शेअर्स

आज, मेहाई टेक्नॉलॉजी लिमिटेडचे ​​शेअर्स 30.10 च्या किमतीवरून 1 टक्क्यांनी वाढून 30.50 रुपये प्रति शेअरवर पोहोचले होते. यामध्ये इंट्राडेची उच्चांकी पातळी 30.50 रुपये होती आणि इंट्राडे नीचांकी पातळी 29.85 रुपये होती. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 34.64 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 12.3 रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप 31.99 कोटी रुपये आहे.

कंपनीबाबत माहिती

कंपनी एलईडी बल्ब, ट्यूबलाइट आणि पॉवर बँक ऑफर करते. कंपनी पूर्व भारतातील एक इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन ऑपरेटर आहे जी ग्राहकांना त्यांच्या सर्व इलेक्ट्रॉनिक्स गरजांसाठी वन-स्टॉप-शॉप प्रदान करते. सध्या कंपनीची पाटण्यात 16 इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्टोअर्स आहेत आणि कोलकात्यात 4 नवीन स्टोअर्स उघडण्याची योजना आहे.  

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Received order of rs 4000000 Mehai Technology Ltd West Bengal government given big work the share is rs 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.