Lokmat Money >शेअर बाजार > टायटन नाही, तर 'या' शेअरने राकेश झुनझुनवालांना बनवले 'बिग बुल', आज 1 हजार कोटींचा नफा

टायटन नाही, तर 'या' शेअरने राकेश झुनझुनवालांना बनवले 'बिग बुल', आज 1 हजार कोटींचा नफा

Rakesh Jhunjhunwala Investment : कधीकाळी ज्या कंपनीत झुनझुनवालांनी केलेली गुंतवणूक, आज त्या कंपनीला 1 हजार कोटींचा नफा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 19:45 IST2025-01-27T19:45:06+5:302025-01-27T19:45:58+5:30

Rakesh Jhunjhunwala Investment : कधीकाळी ज्या कंपनीत झुनझुनवालांनी केलेली गुंतवणूक, आज त्या कंपनीला 1 हजार कोटींचा नफा.

Rakesh Jhunjhunwala ACC Share: Not Titan, but 'ACC' share made Rakesh Jhunjhunwala a 'Big Bull', profit of 1 thousand crores today | टायटन नाही, तर 'या' शेअरने राकेश झुनझुनवालांना बनवले 'बिग बुल', आज 1 हजार कोटींचा नफा

टायटन नाही, तर 'या' शेअरने राकेश झुनझुनवालांना बनवले 'बिग बुल', आज 1 हजार कोटींचा नफा

Rakesh Jhunjhunwala ACC Share : दिवंगत राकेश झुनझुनवाला यांचे नाव खूप आदराने घेतले जाते. शेअर बाजारात ते 'बिग बुल' नावाने ओळखले जातात. शेअर बाजारातगुंतवणूक करणारे अनेकजण आजही झुनझुनवालांची स्ट्रॅटजी फॉलो करतात. दरम्यान, अनेकांना वाटते की, टायटन कंपनीच्या शेअर्समधून झुनझुनवालांना मोठा फायदा झाला होता. परंतु फार कमी लोकांना माहित आहे की, टायटन खरेदी करण्यापूर्वी त्यांनी एका मोठ्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती, ज्याने मल्टीबॅगर परतावा दिला.

या शेअरने बनवले बिग बुल
राकेश झुनझुनवाला यांनी 1991 साली सिमेंट उत्पादक कंपनी ACC चे 14,000 शेअर्स 534 रुपये किमतीला खरेदी केले होते. त्याची एकूण किंमत सुमारे 75 लाख रुपये होती. पुढे हाच शेअर त्यांनी 3400 रुपये प्रति शेअर दराने विकला. यातून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा नफा मिळवला. विशेष म्हणजे, आज त्याच कंपनीचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे.

कंपनीला हजार कोटींचा नफा 
ACC लिमिटेडने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 1,091.8 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 537.67 कोटी रुपयांचा नफा झाला होता. म्हणजेच, यावर्षी कंपनीचा नफा जवळपास दुपटीने वाढला आहे. दरम्यान, या तिमाहीत कंपनीचे ऑपरेटिंग इनकम 5,207.3 कोटी रुपये होते. वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा 4,855.22 कोटी रुपये होता. 

निकालांवर भाष्य करताना कंपनीचे संचालक आणि सीईओ अजय कपूर म्हणाले की, तिसऱ्या तिमाहीचे निकाल उच्च विक्री, मर्यादित खर्च आणि वाढीव कार्यक्षमतेद्वारे वाढीवर धोरणात्मक भर दर्शवतात.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

 

 

Web Title: Rakesh Jhunjhunwala ACC Share: Not Titan, but 'ACC' share made Rakesh Jhunjhunwala a 'Big Bull', profit of 1 thousand crores today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.