Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजारातील पडझडीत DMart च्या दमानींच्या 'या' शेअरची कमाल! आतापर्यंत १७००% परतावा

शेअर बाजारातील पडझडीत DMart च्या दमानींच्या 'या' शेअरची कमाल! आतापर्यंत १७००% परतावा

Radhakishan Damani Portfolio : शेअर बाजारात मोठी घसरण होऊनही, राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या या कंपनीचे शेअर्स स्थिर राहिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 14:12 IST2026-03-23T14:06:15+5:302026-03-23T14:12:13+5:30

Radhakishan Damani Portfolio : शेअर बाजारात मोठी घसरण होऊनही, राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या या कंपनीचे शेअर्स स्थिर राहिले.

Radhakishan Damani Portfolio: VST Industries Share Shows Resilience Amid Market Crash | शेअर बाजारातील पडझडीत DMart च्या दमानींच्या 'या' शेअरची कमाल! आतापर्यंत १७००% परतावा

शेअर बाजारातील पडझडीत DMart च्या दमानींच्या 'या' शेअरची कमाल! आतापर्यंत १७००% परतावा

Radhakishan Damani Portfolio :शेअर बाजारात सध्या इराण-इस्रायल युद्धाच्या सावटाखाली मोठी पडझड सुरू असताना, दिग्गज गुंतवणूकदार आणि 'डीमार्ट'चे संस्थापक राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओमधील एका शेअरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोमवारी, २३ मार्च रोजी जेव्हा आघाडीच्या कंपन्यांचे शेअर्स कोलमडत होते, तेव्हा 'व्हीएसटी इंडस्ट्रीज'चा शेअर मात्र चिवटपणे किरकोळ वाढीसह व्यवहार करत होता.

दिवसभराची नाट्यमय वाटचाल
सोमवारी सकाळी बाजारात नकारात्मक वातावरण असताना व्हीएसटी इंडस्ट्रीजचा शेअर २१४ रुपयांवर उघडला. सुरुवातीच्या सत्रात त्याने २११ रुपयांचा निचांकी स्तर गाठला. परंतु लवकरच खरेदीचा जोर वाढल्याने शेअर पुन्हा २१४ रुपयांच्या वर स्थिरावला. जिथे मोठ्या 'ब्लू-चिप' कंपन्या ५ ते ७ टक्क्यांनी घसरत आहेत, तिथे या शेअरने दाखवलेली स्थिरता गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

राधाकिशन दमानी यांची 'मोठी' बाजी
राधाकिशन दमानी यांनी २०१६ पासून या कंपनीत आपली गुंतवणूक कायम ठेवली आहे. सध्या त्यांची या कंपनीत २९% इतकी मोठी भागीदारी असून, त्याचे बाजारमूल्य सुमारे ११०० कोटी रुपये आहे. गेल्या १० वर्षांपासून त्यांनी या शेअरवर आपला विश्वास कायम ठेवला आहे.

काय आहे 'व्हीएसटी इंडस्ट्रीज'चा व्यवसाय?
पूर्वी 'वजीर सुलतान टोबॅको कंपनी' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीची स्थापना १९३० मध्ये झाली होती. ही कंपनी जगातील अग्रगण्य 'ब्रिटीश अमेरिकन टोबॅको पीएलसी'ची सहयोगी कंपनी आहे. ३६३५ कोटींचे मार्केट कॅप असलेली ही कंपनी भारतातील सिगरेट बाजारातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचा 'टोटल' हा सिगरेट ब्रँड देशातील टॉप १० ब्रँड्समध्ये गणला जातो.

परताव्याचा इतिहास
या शेअरने दीर्घकाळात गुंतवणूकदारांना १७००% इतका बंपर परतावा दिला आहे. मात्र, गेल्या ५ वर्षांत २९% आणि गेल्या एका वर्षात २०% पेक्षा जास्त घसरण या शेअरमध्ये पाहायला मिळाली आहे.

वाचा - महागाईचे नवे संकट! रुपया कोसळल्याने पेट्रोल, डिझेल आणि मोबाईल महागणार; पाहा काय सांगताहेत तज्ज्ञ

तज्ज्ञांचा काय आहे सल्ला?
'चॉईस इक्विटी ब्रोकिंग'चे सचिन गुप्ता यांनी या शेअरबाबत सावध पवित्रा घेतला आहे. त्यांच्या मते, २०३ रुपयांचा स्तर या शेअरसाठी अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. जर हा स्तर तुटला, तर शेअरमध्ये मोठी घसरण होऊ शकते. २२९ रुपयांची पातळी हा या शेअरसाठी मोठा अडथळा असून, त्या पार गेल्याशिवाय मोठी तेजी येणे कठीण आहे.
 

Web Title : शेयर बाजार की गिरावट में डीमार्ट के दमानी का 'यह' शेयर चमका

Web Summary : बाजार में गिरावट के बीच, राधाकिशन दमानी की वीएसटी इंडस्ट्रीज ने मजबूती दिखाई। 2016 से दमानी की 29% हिस्सेदारी (₹1100 करोड़) है। हालिया गिरावट के बावजूद, शेयर ने 1700% रिटर्न दिया है। विशेषज्ञ ₹203 को महत्वपूर्ण समर्थन स्तर मानते हैं।

Web Title : DMart's Damani's VST Industries shines amidst market downturn, yields 1700% return.

Web Summary : Amidst market volatility, Radhakishan Damani's VST Industries shows resilience. Damani holds 29% stake (₹1100 crore) since 2016. Despite recent dips, the share has delivered a 1700% return. Experts advise caution, noting ₹203 as crucial support.