Lokmat Money >शेअर बाजार > Quadrant Future Tek IPO: २९% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' आयपीओ, पहिल्याच दिवशी ₹३७४ वर आला शेअर; गुंतवणूकदार मालामाल

Quadrant Future Tek IPO: २९% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' आयपीओ, पहिल्याच दिवशी ₹३७४ वर आला शेअर; गुंतवणूकदार मालामाल

Quadrant Future Tek IPO: क्वाड्रंट फ्युचर टेकचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची चांगली लिस्टिंग झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:40 IST2025-01-14T13:40:59+5:302025-01-14T13:40:59+5:30

Quadrant Future Tek IPO: क्वाड्रंट फ्युचर टेकचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची चांगली लिस्टिंग झाली.

Quadrant Future Tek IPO This IPO listed at a 29 percent premium share rose to rs 374 on the first day Investors got rich | Quadrant Future Tek IPO: २९% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' आयपीओ, पहिल्याच दिवशी ₹३७४ वर आला शेअर; गुंतवणूकदार मालामाल

Quadrant Future Tek IPO: २९% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' आयपीओ, पहिल्याच दिवशी ₹३७४ वर आला शेअर; गुंतवणूकदार मालामाल

Quadrant Future Tek IPO: क्वाड्रंट फ्युचर टेकचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची चांगली लिस्टिंग झाली. क्वाड्रंट फ्युचर टेकचा शेअर बीएसईवर तब्बल २९ टक्के प्रीमिअमवर म्हणजेच ३७४ रुपयांवर लिस्ट झाला. तर एनएसईवर तो २८ टक्क्यांच्या प्रीमिअमवर म्हणजेच ३७० रुपयांवर पोहोचला. लिस्टिंगच्या काही मिनिटांतच हा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या आणि त्यात ४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. यासह हा शेअर ३८८ रुपयांवर पोहोचला. क्वाड्रंट फ्युचर टेकचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी ७ ते ९ जानेवारी दरम्यान खुला होता. पब्लिक इश्यूला एकूण १८६.६६ पट सब्सक्राइब करण्यात आलं.

किती सब्सक्रिप्शन?

शेअर विक्रीच्या शेवटच्या दिवशी क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडचा आयपीओ १८५.८२ पट सब्सक्राइब झाला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, सुरुवातीच्या शेअर विक्रीत ५७,९९,९९९ शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत १,०७,७७,२९,३०० शेअर्ससाठी बोली लागली होती. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा २५४.१६ पट, तर किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा २४३.१२ पट सब्सक्राइब करण्यात आला. क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा (QIB) हिस्सा १३२.५४ पट सब्सक्राइब करण्यात आला. क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडचा आयपीओ पहिल्याच दिवशी काही मिनिटांत भरला.

अँकर गुंतवणूकदारांकडून १३० कोटी जमा

कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून १३० कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा केली होती. आयपीओसाठी २७५ ते २९० रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. हा आयपीओ पूर्णपणे २९० कोटी रुपयांच्या नवीन शेअर्सवर आधारित आहे आणि त्यात कोणत्याही ऑफर फॉर सेलचा (OFS) समावेश नाही. आयपीओतून मिळणारी रक्कम दीर्घकालीन कार्यशील भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी वापरली जाणार आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Quadrant Future Tek IPO This IPO listed at a 29 percent premium share rose to rs 374 on the first day Investors got rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.