PNB Stock Price: पीएसयू बँक पंजाब नॅशनल बँकेचा शेअर १ वर्षाच्या उच्चांकी पातळीवरून सुमारे ३२% सूटीसह व्यवहार करत आहे. शेअरचा एक वर्षाचा उच्चांक १३९ रुपये आहे, तर तो सध्या ९४ रुपयांवर आहे. बँकेच्या तिमाही निकालानंतर (PNB Quarter Result) ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला असून ३० टक्क्यांहून अधिक तेजीची अपेक्षा व्यक्त केली आहे. बँकेनं ७ मे २०२५ रोजी आपले तिमाही निकाल जाहीर केले होते आणि ते बाजाराच्या अंदाजानुसार होते.
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांच्या म्हणण्यानुसार पीएनबीचे तिमाही निकाल संमिश्र आहेत. निव्वळ व्याज उत्पन्न (NII) अपेक्षेपेक्षा कमकुवत झालं आहे, नेट इंटरेस्ट मार्जिन (निम) कमी झालंय आणि प्रोव्हिजनिंग वाढलंय. मात्र, त्यांचं इतर उत्पन्न चांगलं होतं. खर्चाच्या दबावामुळे निव्वळ व्याज मार्जिन कमी झाल्यानं निव्वळ व्याज उत्पन्न घटलं. चौथ्या तिमाहीत व्यवसाय वृद्धी मध्यम होती.
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
किती आहे टार्गेट प्राईज
ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार, चौथ्या तिमाहीत विशेषत: कृषी आणि एमएसएमई क्षेत्रांमध्ये स्लिपेज वाढलं, तर चांगली वसुली आणि राइट-ऑफमुळे मालमत्तेच्या गुणवत्तेचं प्रमाण सुधारले. देशांतर्गत कर्जाच्या एसएमए बुकमध्ये (५० मिलियन रुपयांपेक्षा जास्त कर्जासह) ०.०२% सुधारणा झाली. ब्रोकरेजनं आपला ईपीएस अंदाज कायम ठेवला आहे आणि आर्थिक वर्ष २०२७ आरओए आणि आरओई अनुक्रमे १.०५% आणि १५.५% असण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेजनं शेअरला बाय रेटिंग देताना १२५ रुपयांचे टार्गेट प्राईसही कायम ठेवलंय.
बँकेचा नफा आणि महसूल
बँकेचा निव्वळ नफा (पीएटी) ५२ टक्क्यांनी वाढून ४५.७ अब्ज रुपये झाला आहे. हे इतर उत्पन्नात सुधारणा आणि कमी टॅक्समुळे होतं, जरी एनआयआयमधील घट आणि वाढीव तरतुदींचा काही प्रमाणात परिणाम झाला. कर्जात (तिमाही आधारावर) ०.७ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली, पण वार्षिक आधारावर १५.३ टक्के वाढ झाली. एमएसएमई आणि कृषी क्षेत्रानं यात हातभार लावला.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)