Lokmat Money >शेअर बाजार > ​​​​​​​PSU Bank Stocks: सरकार 'या' ५ बँकांमधील आपला हिस्सा विकणार, शेअर्स आपटले; कोणत्या आहेत बँका?

​​​​​​​PSU Bank Stocks: सरकार 'या' ५ बँकांमधील आपला हिस्सा विकणार, शेअर्स आपटले; कोणत्या आहेत बँका?

​​​​​​​PSU Bank Stocks: काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकारनं क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) मार्गानं पाच पीएसयू बँकांचा १० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:49 IST2025-01-15T12:49:43+5:302025-01-15T12:49:43+5:30

​​​​​​​PSU Bank Stocks: काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकारनं क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) मार्गानं पाच पीएसयू बँकांचा १० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे.

​​​​​​​PSU Bank Stocks Government will sell its stake in central bank iob bom 5 banks stock hits Which are the banks | ​​​​​​​PSU Bank Stocks: सरकार 'या' ५ बँकांमधील आपला हिस्सा विकणार, शेअर्स आपटले; कोणत्या आहेत बँका?

​​​​​​​PSU Bank Stocks: सरकार 'या' ५ बँकांमधील आपला हिस्सा विकणार, शेअर्स आपटले; कोणत्या आहेत बँका?

PSU Bank Stocks: सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी), युको बँक, पंजाब अँड सिंध बँक (पीएसबी) आणि बँक ऑफ महाराष्ट्र (बीओएम) या पाच सरकारी बँकांचे शेअर्स बुधवारी कामकाजादरम्यान फोकसमध्ये होते. या बँकांच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सेंट्रल बँकेचा शेअर आज कामकाजादरम्यान ६ टक्क्यांनी घसरून ५१.५५ रुपयांवर आला. तर आयओबीचा शेअर ७ टक्क्यांनी घसरून ५०.१० रुपयांवर पोहोचला. 

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दुसरीकडे युको बँकेचा शेअर ६ टक्क्यांहून अधिक घसरून ४२.३४ रुपयांवर आला. तर, पीएसबी बँकेचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक घसरून ४५.४९ रुपयांवर आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर ४ टक्क्यांहून अधिक घसरून ५०.६९ रुपयांवर आला. शेअर्समधील या घसरणीमागे एक मोठं कारण आहे. वास्तविक सरकार या बँकांमधील आपला हिस्सा विकत आहे.

काय आहे डिटेल?

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकारनं क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) मार्गानं पाच पीएसयू बँकांचा १० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. चौथ्या तिमाहीपासून छोट्या टप्प्याटप्प्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू होईल. सीएनबीसी-टीव्ही १८ च्या वृत्तानुसार, निर्गुंतवणुकीचा आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाला (दीपम) ऑफर फॉर सेल (ओएफएस) मार्गानं या बँकांतील हिस्सा विकण्याचे आदेश मिळाले आहेत. ऑगस्ट २०२६ पर्यंत या पीएसयू बँकांमध्ये २५ टक्के किमान पब्लिक शेअरहोल्डिंगचे निकष पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: ​​​​​​​PSU Bank Stocks Government will sell its stake in central bank iob bom 5 banks stock hits Which are the banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.