Lokmat Money >शेअर बाजार > Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई

Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई

Ramayana Ranbir Kapoor Share Market Investment: शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, जे अल्पावधीतच त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक ठरले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 11:01 IST2025-08-21T11:01:05+5:302025-08-21T11:01:48+5:30

Ramayana Ranbir Kapoor Share Market Investment: शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, जे अल्पावधीतच त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक ठरले आहेत.

Prime focus stock investment bollywood actor Ranbir Kapoor Ram from the movie Ramayana has made a huge investment in this company earning huge money | Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई

Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई

Ramayana Ranbir Kapoor Share Market Investment: शेअर बाजारात (Stock Market) असे अनेक शेअर्स आहेत, जे अल्पावधीतच त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) ठरले आहेत आणि त्यांचे पैसे अनेक पटींनी वाढवले ​​आहेत. असाच एक शेअर म्हणजे प्राइम फोकसचा (Prime Focus Share) शेअर, जो फक्त चार महिन्यांत सुमारे ८० टक्क्यांनी वाढला आहे, तर गेल्या पाच वर्षांत या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची रक्कम चार पटीने वाढलीये. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरनंही या कंपनीमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केलीये.

शेअरमध्ये मोठी तेजी

बॉलीवूड स्टार रणबीर कपूरने गुंतवणूक केलेल्या प्राइम फोकस कंपनीच्या शेअर्सची किंमत वेगानं वाढत आहे. बुधवारी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी फोकस स्टॉकची किंमत १५९.३० रुपयांवर उघडली आणि नंतर शेअर बाजारात ट्रेडिंगच्या शेवटी ४.०५ टक्क्यांच्या वाढीसह १६५.५८ रुपयांवर बंद झाली. फक्त पाच ट्रेडिंग दिवसांत या शेअर्समध्ये सुमारे १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर २१ एप्रिल ते २१ ऑगस्ट या चार महिन्यांत ते ८०% पेक्षा जास्त वाढले आहे. या वाढीमुळे कंपनीचं मार्केट कॅपही ५१५० कोटी रुपयांपर्यंत वाढलंय.

नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

रणबीर कपूरला कोट्यवधींचा नफा

रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड स्टार रणबीर कपूरकडे या कंपनीचे (Ranbir Kapoor Prime Focus Share) लाखो शेअर्स आहेत, जे त्यानं जुलै महिन्यात खरेदी केले होते. प्रेफरेंशियल इक्विटी इश्यूसाठी शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर त्यानं कंपनीत सुमारे १५ कोटी रुपये गुंतवले आणि त्या बदल्यात त्याला प्राइम फोकसचे १२.५ लाख शेअर्स मिळाले. त्याला हे शेअर्स प्रति स्टॉक १२० रुपये या दरानं मिळाले. सध्याच्या तेजीकडे पाहिल्यास, अभिनेत्याला एकाच वेळी ५.६९ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. खरं तर, सध्याच्या किमतीनुसार, रणबीर कपूरची गुंतवणूक २०.६० कोटी रुपयांपर्यंत वाढलीये.

ही कंपनी रणबीरच्या 'Ramayana'शी संबंधित

नमित मल्होत्रा यांनी १९९७ मध्ये मुंबईत एक छोटी पोस्ट प्रोडक्शन कंपनी म्हणून ही प्राइम फोकस सुरू केली होती, परंतु आता ती व्हीएफएक्स क्षेत्रात एक मोठं नाव बनलं आहे. विशेष म्हणजे रणबीर कपूरनं या कंपनीच्या शेअर्समध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे, तर त्याचा आगामी चित्रपट 'रामायण' (Ranbir Kapoor Ramayana) देखील पोस्ट-प्रॉडक्शन आणि व्हिज्युअल इफेक्ट्सशी ही कंपनी संबंधित आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Prime focus stock investment bollywood actor Ranbir Kapoor Ram from the movie Ramayana has made a huge investment in this company earning huge money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.