Lokmat Money >शेअर बाजार > ₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश

₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश

Motilal Oswal Stocks Suggestions: आज २२ जुलै रोजी शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसत होते. यादरम्यान, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस काही स्टॉक्सवर बुलिश दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 10:58 IST2025-07-22T10:57:56+5:302025-07-22T10:58:26+5:30

Motilal Oswal Stocks Suggestions: आज २२ जुलै रोजी शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसत होते. यादरम्यान, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस काही स्टॉक्सवर बुलिश दिसून येत आहे.

polycab stock may go above rs 8100 Experts motilal oswal bullish on jk cement va tech icici hdfc amc amid market volatility | ₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश

₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश

Motilal Oswal Stocks Suggestions: आज २२ जुलै रोजी शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसत होते. असं असलं तरी काही शेअर्सनं उत्तम कामगिरी केली आहे. यादरम्यान, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस काही स्टॉक्सवर बुलिश दिसून येत आहे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस पॉलिकॅब, जेके सिमेंट, व्हीए टेक, एचडीएफसी एएमसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सवर बुलिश दिसून येत आहे. या कंपन्यांनी बाजारातील चढ उतारादरम्यानही उत्तम कामगिरी केली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसन पॉलिकॅबसाठी ८१३० रुपयांचं टार्गेट प्राईज दिलं असून त्याला बाय रेटिंग दिलंय. तर दुसरीकडे जेके सीमेंटलाही ७३०० रुपयांचं टार्गेट प्राईज आणि बाय रेटिंग दिलंय. याशिवाय त्यांनी व्हीए टेकलाही १९०० रुपयांचं टार्गेट प्राईज दिलं असून बाय रेटिंग दिलंय. याशिवाय त्यांनी आयसीआयसीआयला १६७० रुपयांचं आणि एचडीएफसी एमएमसीला ६४०० रुपयांचं टार्गेट प्राईज दिलंय.

३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी

पॉलिकॅब (Polycab - TP: 8130): या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीची कामगिरी उत्तम राहिली आहे. वार्षिक आधारावर कंपनीचा EBITDA ४७ टक्क्यांनी वाढला असून तो ८.६ अब्ज रुपयांवर पोहोचला. पायाभूत सुविधांना प्रोत्साहन, खाजगी भांडवली खर्च आणि रिअल इस्टेट रिकव्हरीवर देशांतर्गत C&W मागणीवर व्यवस्थापन सकारात्मक राहिलं आहे असं ब्रोकरेजनं म्हटलंय.

जेके सिमेंट (JK Cement - TP:7300): ग्रे सिमेंट सेगमेंटमध्ये कंपनीच्या एकत्रित विक्रीत वार्षिक आधारावर १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मध्य भारत आणि बिहारमधील विस्ताराचाही कंपनीला फायदा झालाय. कंपनीचा EBITDA ६.९ अब्ज रुपये राहिलाय. ग्रीनफिल्ड आणि ब्राउनफिल्ड प्रकल्पांद्वारे आर्थिक वर्ष २०३० पर्यंत ५० दशलक्ष टन क्षमतेपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य, मजबूत अंमलबजावणी आणि खर्चावरील नियंत्रण यामुळे ब्रोकरेदनं याला बाय रेटिंग दिलंय.

व्हीए टेक (VA Tech – TP:1900): व्हीए टेक ही कंपनी जलशुद्धीकरणात जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. तसंच प्रदूषण, टंचाई आणि नियामक गरजांमुळे वाढती मागणी असलेल्या दीर्घकालीन स्ट्रक्चरल वॉटर ट्रीटमेंट थीमवर कंपनी मोठी भूमिका बजावते. जागतिक स्तरावर खाजगी जलशुद्धीकरण ऑपरेटर म्हणून ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीकडे १३७ अब्ज रुपयांची ऑर्डर बुक असून ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसनं या शेअरवर बाय रेटिंग दिलं असून १९०० रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे.

एचडीएफसी एएमसी (HDFC AMC – TP:6400): एचडीएफसी एएमसीनं तिमाहीचे चांगले आकडे प्रसिद्ध केलेत. आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत तिमाही सरासरी एयूएम २३% वाढून ₹८.३ ट्रिलियन झालाय. इक्विटी, कर्ज, लिक्विडीटी आणि ईटीएफ श्रेणींमध्ये व्यापक वाढीमुळे, त्यांचे वैविध्यपूर्ण नेतृत्व आणि दीर्घकालीन मालमत्ता संचयनात सातत्यपूर्ण वाढ यामुळे एचडीएफसी एएमसी म्युच्युअल फंड उद्योगात एक मजबूत खेळाडू ठरला आहे. ब्रोकरेजनं या शेअरला ६४०० रुपयांचं टार्गेट प्राईज दिलंय.

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank – TP:1670): ICICI बँकेने पहिल्या तिमाहीत १५.५% वार्षिक PAT वाढ नोंदवली. बिझनेस बँकिंगला मजबूत गती मिळाली आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअलनं या शेअरला १६७० रुपयांचं टार्गेट प्राईज दिलं आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: polycab stock may go above rs 8100 Experts motilal oswal bullish on jk cement va tech icici hdfc amc amid market volatility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.