Lokmat Money >शेअर बाजार > प्रति शेअर ₹35 लाभांश देण्याची घोषणा, वायर कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले...

प्रति शेअर ₹35 लाभांश देण्याची घोषणा, वायर कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले...

Polycab India Stock: कंपनीने आज जानेवारी-मार्च तिमाहीचे निकालही जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 17:50 IST2025-05-06T17:49:30+5:302025-05-06T17:50:04+5:30

Polycab India Stock: कंपनीने आज जानेवारी-मार्च तिमाहीचे निकालही जाहीर केले.

Polycab India Stock: Announcement of dividend of ₹35 per share | प्रति शेअर ₹35 लाभांश देण्याची घोषणा, वायर कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले...

प्रति शेअर ₹35 लाभांश देण्याची घोषणा, वायर कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले...

Polycab India Stock: पॉलीकॅब इंडिया लिमिटेडचे ​​शेअर्स आज ट्रेडिंगदरम्यान फोकसमध्ये होते. हे शेअर्स आज 2% ने वाढून 5910 रुपयांवर पोहोचले. शेअर्समधील या वाढीमागे एक घोषणा आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने मंगळवारी(6 मे) 2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर 35 रुपये लाभांश जाहीर केला आहे. या लाभांशाची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेत सदस्यांनी लाभांश मंजूर केला तर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत लाभांश दिला जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने आज जानेवारी-मार्च तिमाहीचे निकालही जाहीर केले. या घोषणेनंतर शेअर दिवसाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा महसूल 25% वाढून ₹6985.7 कोटी झाला आहे. पॉलीकॅबचा EBITDA गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 34.7% वाढून ₹1,025.7 कोटी झाला आहे. तसेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्जिन 110 बेसिस पॉइंट्सने वाढून 14.7% झाला. मजबूत टॉपलाइन वाढीमुळे निव्वळ नफा 35% वाढून ₹727 कोटी झाला.

कंपनीचा व्यवसाय
पॉलीकॅब इंडिया लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी वायर आणि केबल उत्पादक कंपनी आहे. कंपनीचा व्यवसाय संपूर्ण भारतात 23 उत्पादन सुविधा, 15 हून अधिक कार्यालये आणि 25 हून अधिक गोदामांमध्ये पसरलेला आहे. 

(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
 

Web Title: Polycab India Stock: Announcement of dividend of ₹35 per share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.