Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > गुंतवणुकीची मोठी संधी! PhonePe च्या IPO ला SEBI ची मंजुरी, कधी येणार बाजारात? जाणून घ्या...

गुंतवणुकीची मोठी संधी! PhonePe च्या IPO ला SEBI ची मंजुरी, कधी येणार बाजारात? जाणून घ्या...

PhonePe IPO: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:52 IST2026-02-13T13:50:02+5:302026-02-13T13:52:10+5:30

PhonePe IPO: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी!

PhonePe IPO: Big investment opportunity! SEBI approves PhonePe's IPO, when will it hit the market? | गुंतवणुकीची मोठी संधी! PhonePe च्या IPO ला SEBI ची मंजुरी, कधी येणार बाजारात? जाणून घ्या...

गुंतवणुकीची मोठी संधी! PhonePe च्या IPO ला SEBI ची मंजुरी, कधी येणार बाजारात? जाणून घ्या...

PhonePe IPO:शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. डिजिटल पेमेंट क्षेत्रातील आघाडीची कंपनी PhonePe ला आपला IPO आणण्यासाठी बाजार नियामक SEBI कडून मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीनंतर PhonePe चा IPO लवकरच शेअर बाजारात येण्याची शक्यता आहे.

PhonePe ने सप्टेंबर 2025 मध्ये IPO साठी कॉन्फिडेन्शियल रूटमार्फत सेबीकडे कागदपत्रे सादर केली होती. अहवालानुसार, या IPO मध्ये कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार वॉलमार्ट, मायक्रोसॉफ्ट आणि टायगर ग्लोबल आपली काही हिस्सेदारी विकू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

डिजिटल पेमेंट्सवर कंपनीचा भर

अमेरिकन रिटेल दिग्गज वॉलमार्टच्या मालकीची फिनटेक कंपनी PhonePe ची स्थापना 2015 मध्ये झाली. अल्पावधीतच कंपनीने प्रचंड लोकप्रियता मिळवत भारतातील UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) नेटवर्कवरील आघाडीचे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. डिसेंबर 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूमच्या दृष्टीने PhonePe चा सुमारे 45 टक्के मार्केट शेअर आहे.

डिजिटल पेमेंट्सच राहणार वाढीचा कणा

सेबीकडे सादर केलेल्या ड्राफ्ट कागदपत्रांमध्ये PhonePe ने स्पष्ट केले आहे की, डिजिटल पेमेंट्स हेच कंपनीच्या वाढीचे प्रमुख ग्रोथ इंजिन राहणार आहेत. यासाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार, नवीन यूजर्स जोडणे आणि बाजारातील उपस्थिती वाढवण्यावर कंपनीचा भर आहे.

कंपनीच्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2025 पर्यंत भारतातील डिजिटल कन्झ्युमर पेमेंट्सचा टोटल अ‍ॅड्रेसेबल मार्केट (TAM) सुमारे 301 लाख कोटी रुपये होता. तर, 2030 पर्यंत हा बाजार 602 ते 681 लाख कोटी रुपये इतका होण्याचा अंदाज आहे.

PhonePe चा मजबूत यूजर आणि मर्चंट बेस

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात नोंदवण्यात आलेल्या एकूण 2,160 कोटी UPI व्यवहारांपैकी 980 कोटी व्यवहार PhonePe द्वारे प्रक्रिया करण्यात आले.

सध्या PhonePe कडे 60 कोटींहून अधिक नोंदणीकृत यूजर्स आणि देशभरातील सुमारे 5 कोटी मर्चंट्सना डिजिटल पेमेंट सोल्यूशन्स देणारे विस्तृत नेटवर्क आहे. UPI व्यवहारांतील वर्चस्व, मजबूत यूजर बेस आणि वेगाने वाढणारा डिजिटल पेमेंट्स बाजार पाहता, PhonePe चा IPO गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. सेबीची मंजुरी मिळाल्यानंतर आता बाजाराचे लक्ष IPO च्या आकारमान, मूल्यांकन आणि वेळापत्रकाकडे लागले आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title : PhonePe आईपीओ को SEBI की मंजूरी; जल्द बाजार में?

Web Summary : PhonePe के आईपीओ को SEBI की मंजूरी मिली, जल्द ही बाजार में लॉन्च होने की संभावना है। वॉलमार्ट द्वारा समर्थित, डिजिटल भुगतान में अग्रणी कंपनी के पास UPI लेनदेन में 45% बाजार हिस्सेदारी है। एक विशाल उपयोगकर्ता आधार और बढ़ते डिजिटल भुगतान बाजार के साथ, PhonePe का आईपीओ निवेशकों का ध्यान आकर्षित करता है।

Web Title : PhonePe IPO gets SEBI nod; market launch soon?

Web Summary : PhonePe's IPO receives SEBI approval, signaling a potential market launch soon. Backed by Walmart, the digital payment leader boasts a 45% market share in UPI transactions. With a vast user base and growing digital payments market, PhonePe's IPO attracts investor attention.