Penny Stock Yuvraaj Hygiene Products : २१ दिवसांत पैसा दुप्पट.. मथळा वाचून ही काहीतरी स्पाँजी स्कीम असले, असं तुमच्याही मनात आलं ना? पण, कुठलीही फसवू योजना नसून वास्तविक लोकांचे पैसे दुप्पट झाले आहेत. ही शेअर बाजारातील एका स्टॉक्सची कमाल आहे. सध्या बाजारात प्रचंड अस्थिरता असताना एक पेनी स्टॉक रॉकेट सारखी झेप घेतोय. या शेअरची किंमत ६ रुपयांपेक्षा कमी आहे. युवराज हायजीन प्रोडक्ट्स लिमिटेड असे या पेनी स्टॉकचे नाव आहे. यामध्ये अनेक दिवसांपासून अप्पर सर्किट लागत आहे. मंगळवारीही त्यात ५ टक्के अपर सर्किट होते.
या शेअरने अवघ्या २१ दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. १७ डिसेंबर रोजी या शेअरची किंमत २.८३ रुपये होती. आता या शेअरची किंमत ५.४९ रुपये आहे. अशा स्थितीत २१ दिवसांत गुंतवणूकदारांना जवळपास दुप्पट परतावा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये सातत्याने ५ टक्क्यांची अपर सर्किट पाहायला मिळत आहे.
एका महिन्यात १५०% पेक्षा जास्त परतावा
या शेअरने महिनाभरात गुंतवणूकदारांचे खिसे भरले आहेत. एका महिन्यात सुमारे १५७ टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी त्यात १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत २.५७ लाख रुपये झाली असती. म्हणजेच एका महिन्यात तुम्हाला १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर १.५७ लाख रुपयांचा नफा झाला असता.
६ महिन्यांत पैसे तिप्पट
याच शेअरच्या ६ महिन्यांच्या परताव्याबद्दल बोलायचं झालं तर या कालावधीतही गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याची किंमत १.८६ रुपये होती. अशा परिस्थितीत या ६ महिन्यांत १९५ टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांची रक्कम जवळपास तिप्पट झाली आहे. याने एका वर्षात २५० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एका वर्षात त्याचा परतावा २७१ टक्के होता. जर तुम्ही वर्षभरापूर्वी १ लाख रुपये गुंतवले असते तर आज ते ३.७१ लाख रुपये झाले असते.
काय करते कंपनी?
कंपनीची स्थापना १९९५ मध्ये झाली. ही कंपनी स्नानगृह, फरशी, स्वयंपाकघर इत्यादी साफसफाईशी संबंधित उत्पादने जसे की झाडू, मॉप्स, वाइपर इ. याशिवाय कंपनी बॉडी स्क्रबर इत्यादी वैयक्तिक स्वच्छता उत्पादने देखील तयार करते. बीएसईच्या अधिकृत वेबसाइटनुसार, कंपनीचे मार्केट कॅप ४९.७७ कोटी रुपये आहे.
डिस्क्लेमर : यात केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा कुठल्याही प्रकारे गुंतवणूक करण्याचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्या.