Penny Stock: शेअर बाजारातगुंतवणूक करणं, विशेषतः भू-राजकीय चिंता वाढत असताना, हे एक कठीण काम वाटू शकतं. म्हणूनच, काळजीपूर्वक स्टॉक निवडणं अत्यंत महत्त्वाचं असतं, ज्यासाठी सखोल रिसर्च आणि तपशीलवार विश्लेषण आवश्यक आहे. एक असा स्टॉक आहे ज्यानं सातत्यानं बाजारपेठेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावाही दिलाय. हा स्टॉक इंटिग्रेटेड इंडस्ट्रीजचा आहे.
१ लाख रुपयांची गुंतवणूक झाली ₹८.०५ कोटी
सप्टेंबर २०२० मध्ये इंटिग्रेटेड इंडस्ट्रीजचे शेअर्स ₹०.३० वर व्यवहार करत होते आणि आता बीएसई वर ₹२४.१५ वर व्यवहार करत आहेत. याचा अर्थ असा की पाच वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि कालांतरानं ती कायम ठेवली असती तर त्याचं मूल्य अंदाजे ₹८.०५ कोटी झालं असतं. यामध्ये बोनस आणि शेअर स्प्लिटनंतरच्या नफ्याचा समावेश नाही. कंपनीनं १ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांचे शेअर्स ₹१० वरून ₹१ मध्ये विभाजित केले आणि गेल्या वर्षी एप्रिलमध्ये १:१ बोनस इश्यूची घोषणा केली.
अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
इंटिग्रेटेड इंडस्ट्रिजच्या शेअरची स्थिती
गुरुवारी, बीएसईवर या पेनी स्टॉकची किंमत ८.८१ टक्क्यांनी वाढून ₹२४.७० झाली. या पेनी स्टॉकनं मल्टी-बॅगर रिटर्न दिले आहेत, पाच वर्षांच्या इतिहासात यात ८२,२३३.३३ टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. तथापि, या मल्टी-बॅगर पेनी स्टॉकनं अल्पकालीन गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिलाय. गेल्या वर्षी या स्टॉकमध्ये ३७ टक्क्यांची घसरण झाली. २०२५ च्या सुरुवातीपासून, या स्टॉकमध्ये १५.२४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या कालावधीत, तो ₹२९.१४ वरून सध्याच्या बाजार पातळीपर्यंत घसरला आहे.
कंपनीचा व्यवसाय काय?
पूर्वी इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीचे मे २०२३ मध्ये इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेड असं नाव बदलण्यात आलंय. १९९५ मध्ये स्थापन झालेली आणि नोएडा येथे मुख्यालय असलेली ही कंपनी देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी ऑर्गेनिक आणि नॉन-ऑर्गेनिक फूड उत्पादनं, बेकरी उत्पादनं आणि प्रोसेस्ड फूड तयार करते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)