Penny Multiblogger stock: शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. पण, कधी-कधी असा एखादा शेअर येतो, जो गुंतवणूकदारांना मालामाल करतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना कमी कालावधीत करोडपती बनवले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या 13 पैशांच्या शेअरने तब्बल 34000% परतावा दिला आहे.
आम्ही ज्या शेअरबद्दल बोलत आहोत, तो मल्टीबॅगर स्टॉक हुजूर मल्टी प्रोजेक्ट्सचा आहे. पाच वर्षांपूर्वी (15 एप्रिल 2020 रोजी ) या शेअरी किंमत फक्त 13 पैसे होती. पण, आता हा शेअर 44 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच पाच वर्षांत या शेअरने 34 हजार टक्के परतावा दिला आहे. एखाद्याने त्यावेळी या कंपनीचे 1 लाख शेअर्स खरेदी केले असते, तर आज त्याला 3.43 कोटी रुपये मिळाले असते.
पाच वर्षांचे सोडा, गेल्या चार वर्षांत या हजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअर्सच्या किमतीत 13 हजार टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एप्रिल 2021 मध्ये या शेअरची किंमत 34 पैसे होती, परंतु एप्रिल 2025 मध्ये 44.65 रुपयांवर पोहोचली. गेल्या वर्षी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सना 1 रुपये दर्शनी मूल्याच्या 10 शेअर्समध्ये विभागण्यात आले होते. कंपनीने असे केल्याने गुंतवणूकदारांना थेट फायदा झाला आणि तिची दर्शनी किंमत वाढली.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)